घरICC WC 2023Most Sixes : वर्ल्डकपमध्ये रोहितची षटकारांची 'फिफ्टी'; युनिवर्स बॉस मोडला विक्रम

Most Sixes : वर्ल्डकपमध्ये रोहितची षटकारांची ‘फिफ्टी’; युनिवर्स बॉस मोडला विक्रम

Subscribe

भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपचा पहिला उंपात्य फेरीचा सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात सुरू आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये हा सामना सुरू असून, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने षटकरांचे अर्धशतक केले. या 50 षटकरांसह रोहितने युनिवर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.

भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपचा पहिला उंपात्य फेरीचा सामना भारत वि. न्यूझीलंड यांच्यात सुरू आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये हा सामना सुरू असून, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने षटकरांचे अर्धशतक केले. या 50 षटकरांसह रोहितने युनिवर्स बॉस ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. (Rohit Sharma break record of chris gayle today Most sixes in a single edition of World Cup 2023)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांतफेरीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माने आक्रमक सुरूवात केली. सुरूवातीपासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरूवात केली. चौकार आणि षटकरांचा पाऊस पाडत 49 धावा करत रोहित शर्मा बाद झाला. पण आपल्या छोट्या खेळीत रोहितने अनेक विक्रम ध्वस्त केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पोलिसांना अज्ञाताकडून धमकी, भारत-न्यूझीलंड सामन्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ

वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात 50 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याशिवाय एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकाराची नोंदही रोहितच्या नावावर झाली आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार लगावले होते. रोहित शर्माने आज हा विक्रम मोडला आहे. रोहितने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक रुप धारण केले होते.

- Advertisement -

 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरोधात झंझावत सुरुवात केली. ट्रेंट बोल्ट आणि साऊदी या आघाडीच्या गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्माने वादळी फलंदाजी करता भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे. 2015 मध्ये रोहित शर्माने विश्वचषकात पदार्पण केले होते. त्यानंतर 2019 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला होता.


हेही वाचा – IND vs NZच्या उपांत्य सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज, भारत काढणार 2019चा वचपा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -