घरक्रीडाऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितला विश्रांती ?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितला विश्रांती ?

Subscribe

भारतीय संघाची निवड १५ फेब्रुवारीला

आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी १५ फेब्रुवारीला भारतीय संघाची निवड होणार आहे. मे महिन्यात सुरू होणारा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय या मालिकेत संघातील काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने हे विश्वचषकाआधीचे भारताचे शेवटचे आंतरराष्ट्रीय सामने आहेत. यानंतर खेळाडूंना सरावाची संधी फक्त आयपीएलमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत संघातील संतुलन सांभाळून जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्यावर भारतीय निवड समितीचा भर असेल. या मालिकेत रिषभ पंतला संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे, तसेच लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडमध्ये विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह संघात परतु शकेल.

- Advertisement -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम आणि बंगळुरु येथे होतील, तर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका २ मार्चपासून सुरू होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -