घरक्रीडाSanjay Singh: निलंबित होऊनही करणार राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन; कुस्ती संघटना अन् क्रीडा...

Sanjay Singh: निलंबित होऊनही करणार राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन; कुस्ती संघटना अन् क्रीडा मंत्रालयातच जुंपली

Subscribe

डब्ल्यूएफआयचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह हे क्रीडा मंत्रालयाशी लढण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे. नवनिर्वाचित युनियन आणि समितीचं निलंबन आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलं तर बंदी असतानाही त्यांनी लवकरच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचं वक्तव्य केलं आहे.

नवी दिल्ली: WFI: भारतीय कुस्ती महासंघ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. क्रीडा मंत्रालयाने नुकतेच नवनिर्वाचित WFI ला निलंबित केले होते. संघाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान, डब्ल्यूएफआयचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह हे क्रीडा मंत्रालयाशी लढण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसत आहे. नवनिर्वाचित युनियन आणि समितीचं निलंबन आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी म्हटलं तर बंदी असतानाही त्यांनी लवकरच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचं वक्तव्य केलं आहे. (Sanjay Singh Will organize national competitions despite suspension The wrestling association and the sports ministry have fight together)

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय सिंह म्हणाले, “आम्ही लोकशाही पद्धतीने निवडून आलो आहोत. रिटर्निंग ऑफिसरने कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. ते याकडे दुर्लक्ष कसे करणार? आम्ही हे तात्पुरते पॅनेल स्वीकारत नाही. WFI सुरळीतपणे काम करत आहे. जर राज्य संघटना संघ पाठवत नाहीत तर ते (अॅड-हॉक पॅनेल) राष्ट्रीय संघांचे आयोजन कसे करतील.

- Advertisement -

राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केलं जाईल

संजय सिंह म्हणाले, “आम्ही लवकरच राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू. आम्ही लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलावत आहोत. बैठकीच्या नोटिसा एक-दोन दिवसांत पाठवल्या जातील. आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे स्पष्टीकरण आम्ही मंत्रालयाला पाठवले होते. आम्ही अजूनही उत्तराची वाट पाहत आहोत. एक-दोन दिवस वाट पाहू. जर त्यांना आमच्याशी संपर्क साधायचा नसेल तर आम्हालाही रस नाही. आमचे महासंघ क्रीडा मंत्रालयाने केलेलं निलंबन मानत नाही.

मागच्या बुधवारी, क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन केल्यानंतर, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) महासंघाच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी तात्पुरती समिती स्थापन केली होती. वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपिंदर सिंह बाजवा या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यात ऑलिम्पियन एमएम सोमाया आणि माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मंजुषा कंवर यांचाही समावेश आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: IND vs SA Test: दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल; ‘या’ खेळाडूंची होऊ शकते एंट्री )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -