घरनवी मुंबईTruck Drivers Protest : पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रायगड अन् नवी मुंबईच्या Petrol Pumpवर...

Truck Drivers Protest : पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रायगड अन् नवी मुंबईच्या Petrol Pumpवर वाहनांची मोठी गर्दी

Subscribe

दुचाकी वाहनांबरोबरच रिक्षाचालक खाजगी बसेस चार चाकी वाहने आणि शालेय बसेसने देखील इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.  

रायगड : केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याविरोधात देशभरात वाहन चालक संघटनेकडून विरोध करण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व पेट्रोलियम कंपनीच्या टँकर चालकांसह विविध वाहन चालक संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात येत आहे. टक-टँकर चालकांचे आंदोलन किती दिवस चालते हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेल याचा पुरवठा कमी होण्याच्या भीतीपोटी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. हे चित्र मुंबई, रायगड आणि नवी मुंबईतील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगाल लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

नाताळ आणि नवीव वर्षाच्या सुट्टीनंतर इंग्रजी माध्यमांशाच्या शाळा आज सुरू झाल्या आहेत. पण आज शाळेच्या पहिल्याच दिवस ट्रक-टँकर संप पुकारल्यामुळे पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी शालेय बसेस देखील पेट्रोल पंपावर दाखल झाल्या आहेत. त्यासोबत दुचाकी वाहनांबरोबरच रिक्षाचालक खाजगी बसेस चार चाकी वाहने मोठी गर्दी पेट्रोल पंपावर पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Truck Drivers Protest : वाहनचालकांकडून पालघरमध्ये चक्काजाम; संपामुळे इंधनटंचाई

दिवसभराचा पेट्रोल-डिझेलचा साठा तीन तासात विकला

पेट्रो केमिकल कंपन्यांच्या पुरवठा करणाऱ्या वाहन चालकाच्या संघटना या आंदोलनात सहभागी झाल्याने आगामी कालावधीत यावर तोडगा निघेपर्यंत इंधनाचा तुटवडा भासणार आहे. दिवसभरात विकले जाणारे पेट्रोल-डिझेलचा साठा अवघ्या तीन तासात आज सकाळपासून विक्रला गेले आहे, अशी माहिती पेट्रोल पंप कर्मचारी प्रकाश दाइरा यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “आता काँग्रेसही फुटणार…”, सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania यांचा खळबळजनक दावा

वसईत पोलिसांकडून कडक बंदोबस्त

नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी सोमवारी (1 जानेवारी) दुपारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर वसईच्या हद्दीत रास्ता रोको आंदोलन केले होते. त्याला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. त्यामुळे हायवेवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. आज सकाळी बोईसरजवळील चिल्हार फाटा येथे वाहनचालकांनी हायवे रोको आंदोलने केले. त्यामुळे हायवेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हायवेवर वसईच्या हद्दीत आज सकाळपासूनच पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -