घरक्रीडाटॉन्टनच्या खेळपट्टीबाबत सर्फराज नाराज

टॉन्टनच्या खेळपट्टीबाबत सर्फराज नाराज

Subscribe

क्रिकेट विश्वचषकामध्ये बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणार्‍या या संघांमधील हा सामना टॉन्टन येथे होणार आहे. या सामन्याची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना अनुकूल असण्याची शक्यता आहे आणि हीच गोष्ट पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदच्या पथ्यावर पडलेली नाही. टॉन्टनच्या खेळपट्टीवर अधिक गवत असल्याने चेंडूला अधिक उसळी तसेच वेग मिळण्याची शक्यता आहे आणि याचा फायदा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला होईल असे सर्फराजला वाटते.

पाकिस्तानचा या विश्वचषकातील पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता, ज्यात त्यांचा डाव अवघ्या १०५ धावांत आटोपला होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी उसळी घेणार्‍या (बाउन्सर) चेंडूंचा भडीमार करत पाकिस्तानी फलंदाजांना चांगलेच अडचणीत टाकले होते. ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नेथन कुल्टर-नाईल असे उंचपुरे वेगवान गोलंदाज असल्याने ते पाकिस्तानच्या फलंदाजांना बॅकफूटवर टाकू शकतील.

- Advertisement -

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये नेहमीच पाकिस्तानच्या संघाला प्रतिकूल अशा खेळपट्ट्या मिळतात असाही सर्फराजचा आरोप आहे. टॉन्टनमध्ये एकदिवसीय सामना खेळण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ असणार आहे. तसेच सर्फराजचा कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पहिला एकदिवसीय सामना असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -