घरक्रीडाइतक्यातच उपांत्य फेरीची चर्चा नको!

इतक्यातच उपांत्य फेरीची चर्चा नको!

Subscribe

इंग्लंडमध्ये सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात आहे. त्यांनी पहिले दोन सामने जिंकत या स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्स राखून, तर दुसर्‍या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी पराभूत केले.

या दोन्ही सामन्यांत भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने हा संघ उपांत्य फेरी गाठणारच असे भाकीत केले जात आहे. मात्र, अवघ्या दोन सामन्यांनंतर उपांत्य फेरीची चर्चा करणे योग्य नाही, असे विधान कोहलीने केले.

- Advertisement -

अवघ्या २ सामन्यांनंतर उपांत्य फेरीची चर्चा करणे योग्य ठरणार नाही. सुरुवातीचे २ सामने जिंकल्यामुळे आम्हाला उपांत्य फेरी गाठणे सोपे जाईल असेही म्हणता येणार नाही. माझ्या मते किमान ६ सामने झाल्यावर आम्ही या स्पर्धेत कशी कामगिरी करत आहोत याचा खर्‍या अर्थाने अंदाज येईल. मात्र, पहिल्या दोन सामन्यांत इतक्या चांगल्या संघांविरुद्ध आम्ही जशी कामगिरी केली, त्याहून चांगली कामगिरी करू शकलो नसतो, असे कोहली म्हणाला.

आता गुरुवारी भारताचा न्यूझीलंडशी आणि रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच इतके अवघड सामने खेळणे संघासाठी फायदेशीर आहे का?, असे विचारले असता कोहलीने सांगितले, सुरुवातीलाच मोठ्या संघांसोबत सामने खेळल्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.

- Advertisement -

जर हे सामने आम्ही जिंकले, तर उपांत्य फेरी गाठणे आम्हाला सोपे जाईल. त्यामुळे आम्ही पहिल्या दोन सामन्यांत जशी कामगिरी केली, तशीच कामगिरी पुढील सामन्यांतही करणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -