घरमुंबईआरोग्य आणि शिक्षणासाठी आदित्यचा पालिकेत दिवसभर तळ

आरोग्य आणि शिक्षणासाठी आदित्यचा पालिकेत दिवसभर तळ

Subscribe

आढावा बैठकीतून केल्या प्रशासनाला सूचना

विधानसभेच्या राजकीय आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवारी महापालिका मुख्यालयातच तळ ठोकून होते. आदित्य ठाकरे यांनी महापालिकेच्या शिक्षण व आरोग्य विभागाच्या महत्वांच्या पैलूंकडे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांचे लक्ष वेधून सुधारणा करण्याच्या सूचना त्यांना केल्या. विशेष म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आदित्य ठाकरे महापालिकेत होते आणि आयुक्तांनीही सर्व वेळ त्यांनाच दिला होता. त्यामुळे आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक असल्याने आयुक्तांना जावे लागल्याने त्यांनी आदित्यसोबतची बैठक आवरती घ्यावी लागली. तरीही आदित्य ठाकरेंसाठी एवढा वेळ दिल्यामुळे आयुक्त सत्ताधार्‍यांच्या अधीन झाल्याचे स्पष्ट होत आहे.

आदित्य ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासह अधिकार्‍यांबरोबर महापालिकेची रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांच्या त्रुटींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयातील यंत्र सामुग्री नादुरुस्त अवस्थेत असल्याचे सांग रेडीओलॉजीस्ट व टेक्नीशयनची कमरता असल्याने सीटीस्कॅन व एमआरआय मशीनची सुविधा रुग्णांना मिळत नसल्याची बाब मांडली. तसेच रुग्णालयांतील स्वच्छता आवश्यक असून दरदिवशी रुग्णालयांचे स्वच्छता परिक्षण केले जावे,अशी सूचना त्यांनी केली. यशिवाय महापालिका रुग्णालयांतील सुरक्षा रक्षकांची नेमणूक, महापालिका प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि आरोग्य खात्यात समन्वय नसल्याने दरमहिन्याला याबाबतची आढावा बैठक महापौरांसह समिती अध्यक्षांसोबत घ्यावी,अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी आहे.

- Advertisement -

याबरेाबरच आदित्य ठाकरे यांनी शिक्षण विभागातील शालेय शिक्षण व दर्जा आदींबाबत प्रशासनाचे लक्ष वेधून डिजिटल अभ्यासवर्ग, नवीन उपक्रम, स्वसंरक्षण, नॅबेट, महापालिका शाळा ाअणि ब्रिटीश काउुंन्सिल यांचे एकत्रिकरण, खेळाविषयक उपक्रमांचे नियोजन व आढावा आदींबाबत प्रशासनाला सूचना केल्या. यावेळी सभागृहनेत्या विशाखा राउुत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, अश्विनी जोशी, सहआयुक्त मिलिन सावंत, उपायुक्त सुनील धामणे आदी उपस्थित होते.

हॉटेलबाहेर शेड उभारण्यास परवानगी देण्याची मागणी
मुंबईत गच्चीवरील हॉटेल उभारण्याची संकल्पना मांडून त्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या आदित्य ठाकरे यांनी हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत शेड उभारण्यास परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे केली आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या निवेदनानुसार आदित्य ठाकरे यांनीही ही मागणी केली असून त्याला महापालिका आयुक्तांनी तत्वत: मान्यता दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी हॉटेल तसेच दुकानाबाहेर पावसाळ्यात तात्पुरतीसह शेड बांधण्यास प्रशासनाच्यावतीने परवानगी दिली जायची.परंतु ही परवानगी आता प्रशासनाच्यावतीने देणे बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात हॉटेलसमोरील जागेत शेड उभारण्यास महापालिकेच्यावतीने परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -