घरक्रीडाIND vs NZ Test : अजिंक्य रहाणेच्या या चुकीमुळे भारताने सामना गमावला;...

IND vs NZ Test : अजिंक्य रहाणेच्या या चुकीमुळे भारताने सामना गमावला; शेन वॉर्नने व्यक्त केली नाराजी

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा दिगग्ज फिरकीपटू शेन वॉर्नने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या कर्णधार पदाच्या कामगिरीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर झालेल्या भारत आणि न्यूझीलंड मधील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला शेवटचा १ बळी न घेता आल्याने विजयापासून वंचित रहावे लागले. पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करून देखील खराब प्रकाशाच्या कारणास्तव सामना ११ मिनिटे अगोदरच संपवण्यात आला. कदाचित सामना आणखी काही वेळ चालला असता तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागला असता. अशातच ऑस्ट्रेलियाचा दिगग्ज फिरकीपटू शेन वॉर्नने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या कर्णधार पदाच्या कामगिरीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने सांगितले की, नवीन चेंडू उपलब्ध असताना देखील भारतीय कर्णधार रहाणे जुन्या चेंडूचाच वापर करत राहिला.

शेन वॉर्नने ट्विटच्या माध्यमातून म्हंटले की, “मला आश्चर्य वाटते की भारताकडे नवा चेंडू वापरण्यासाठी उपलब्ध असताना देखील तो वापरला नाही. हे विचित्र आहे ज्या प्रकारे षटके कमी होत होती त्याच पध्दतीने प्रकाशही कमी होत होता”.

- Advertisement -

भारतीय संघाने जिंकलेला सामना अखेरीस ड्रॉ ठरल्याने इरफान पठाणननेही राहाणेच्या चुकीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. पठाणनचे म्हंटले की, जर विराट कोहली कानपूरच्या सामन्यात खेळायला असता तर असे झाले नसते. चौथ्या दिवशी भारताने आक्रमक खेळी केली नाही आणि डावाला घोषित करण्यासाठी देखील खूप उशीर केला. यामुळेच न्यूझीलंडच्या संघाला सामन्यात बरोबरी साधण्यात यश मिळाले असे इरफान पठाणने सांगितले.

- Advertisement -

विराट कोहलीचे मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पुनरागमन होणार आहे. श्रेयस अय्यरच्या शानदार खेळीनंतर आतापर्यंत हे निश्चित झाले नाही की रहाणेचा पुढच्या सामन्यात संघात समावेश असू शकतो की नाही. दरम्यान भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारानेही पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे.


हे ही वाचा: http://IND vs NZ Kanpur Test : कोच द्रविड यांची ग्रीन पार्क स्टेडियमला भेट; खेळपट्टी तयार करण्यासाठी दिले ३५००० रूपये


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -