घरक्रीडाशार्दूल ठाकूरला पदार्पणाची संधी

शार्दूल ठाकूरला पदार्पणाची संधी

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. शार्दूलने फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांत १८८ विकेट घेतल्या आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने दुसऱ्या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारताने पहिल्या कसोटी प्रमाणेच दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधी १२ खेडाळूंच्या संघाची घोषणा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात उमेश यादवला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचे संघातील स्थान जाण्याची शक्यता आहे.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता

रणजी ट्रॉफी आणि भारत ‘अ’ संघाकडून सातत्यपूर्ण प्रदर्शनानंतर शार्दूल ठाकूरला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय चमूत निवड झाली होती. पण तिथे त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. पण आता विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. शार्दूलने फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये ५५ सामन्यांत १८८ विकेट घेतल्या आहेत. तर भारताकडून त्याने आतापर्यंत ५ वनडे आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -