घरमुंबईपब्लिसीटीसाठी #MeTooचे आरोप - असरानी

पब्लिसीटीसाठी #MeTooचे आरोप – असरानी

Subscribe

#MeTooचे आरोप हे फक्त पब्लिसिटीसाठी असल्याचे विधान ज्येष्ठ अभिनेते असरान यांनी केले आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणासंबंधित केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये ‘मिटू’ चळवळ आणखी तीव्र झाली आहे. हॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या या चळवळीचे प्रखर पडसाद बॉलिवूडमध्येही उमटताना दिसत आहे. ही चळवळ आता कुठल्या दिशेने जाईल आणि अजून कुणाकुणावर आरोप होतील, याचा अंदाज लावता येणार नाही. आता तर या ‘मिटू’च्या भोवऱ्यात सुपरस्टारही अडकताना दिसत आहेत. त्यामुळे ‘मिटू’च्या आरोपांना सिरिअसली न घेण्याचा सल्ला ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरांनी यांनी दिला आहे.

हेही वाचा – #MeToo : ‘सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला’

नेमकं काय म्हणाले असरान ?

ज्येष्ठ अभिनेते असरानी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, महिलांचा सन्मान केलाच पाहिजे. परंतु, आता सुरु असलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेली ‘मिटू’ चळवळ ही पब्लिसीटी आणि चित्रपट प्रमोशनसाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर फक्त आरोप करण्याला अर्थ नाही. त्यामुळे या आरोपांना सिरिअसली न घेण्याचा सल्ला असरानी यांनी दिला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -