घरक्रीडादक्षिण आफ्रिकेचा भारतावर दणदणीत विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर दणदणीत विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी

Subscribe

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये जोहान्सबर्गमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाने २४० धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखत हे आव्हान पूर्ण केलं आहे. या विजयासह आफ्रिका संघाने ३ गडी गमावत सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. जोहान्सबर्गच्या मैदानावर २९ वर्षांतील टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गरने शानदार फलंदाजी करत १८८ चेंडूत ९६ धावा काढल्या. तसेच तो नाबाद राहिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय सहज मिळाला. मात्र, टीम इंडियातून फलंदाज अजिंक्य रहाणेने ५८ बॉलमध्ये ७८ धावा काढल्या होत्या. तर चेतेश्वर पुजारा ५३ बॉलमध्ये ८६ धावा तर हनुमा विहारी ४० बॉलमध्ये ८४ धावा काढल्या आहेत. या तिघांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे टीम इंडियाने २४० धावांचं लक्ष आफ्रिकेला दिलं होतं. परंतु दक्षिण आफ्रिकेने शानदार खेळी करत आणि ७ गडी राखत हे आव्हान पूर्ण केलं आहे.

- Advertisement -

जोहान्सबर्ग पहिल्यांदाच टीम इंडियाचा पराभव

जोहान्सबर्गच्या वॉन्डरर्स स्टेडियमवर २९ वर्षांतील हा पहिलाच पराभव आहे. टीम इंडियाने या मैदानावर १९९२ साली पहिली कसोटी खेळली होती आणि तो सामना ड्रॉ झाला होता. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने पाचपैकी दोन कसोटी सामने जिंकले होते, तर तीन सामने ड्रॉ झाले होते. गेल्या २९ वर्षात दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला कधीही पराभूत करू शकला नाही, पण आज दक्षिण आफ्रिकेने टीम इंजियावर दणदणीत विजय मिळवला आहे.


हेही वाचा : Team India Schedule 2022: टीम इंडियाचं भारतातले वर्षभरातील शेड्यूल वाचा, कधी आणि कोणत्या संघाविरूद्ध होणार सामने?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -