घरताज्या घडामोडीMovie Postponed: RRR सह 'या' 4 हटके सिनेमांची रिलीज पुढे ढकलली

Movie Postponed: RRR सह ‘या’ 4 हटके सिनेमांची रिलीज पुढे ढकलली

Subscribe

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave Of corona)  पार्श्वभूमीवर देशात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा मोठा फटका पुन्हा एकदा सिनेसृष्टीला बसला आहे. जानेवारी महिन्यात अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. RRR हा बहुप्रतिक्षीत सिनेमा येत्या ७ जानेवारीला रिलीज होणार होता मात्र त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातल्या त्यात अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा डिसेंबर महिन्यात रिलीज झाला मात्र सिनेमा म्हणावा तशी कमाई करू शकलेला नाही. RRR पाठोपाठ ४ तगड्या सिनेमांची रिलीड डेट देखील पुढे ढकलण्यात आली आहे. (including RRR these movies release date has been postponed)  ते सिनेमे कोणते आहेत पाहूयात.

वर्षाच्या सुरुवातीलाच प्रभास, अक्षय कुमार आणि साऊथच्या अनेक सुपरस्टार्सचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. मात्र आता हे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.

- Advertisement -

पृथ्वीराज (Prithviraj) 

अक्षय कुमारचा पृथ्वीराज हा सिनेमा २१ जानेवारीला रिलीज होणार होता. मात्र हा सिनेमा पोस्टपोन करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सिनेमा रिलीज करण्यात काही फायदा नाही असे सिनेमाच्या निर्मात्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जर्सी ( Jersey ) 

जर्सी हा सिनेमा २०२१च्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र त्याच वेळी देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढली आणि अनेक सिनेमागृहे बंद करण्यात आली त्यामुळे या सिनेमाची रिलीज डेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.

गहराइया (Gehraiyaan ) 

 

अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा गहराइया या सिनेमा २५ जानेवारीला रिलीज होणार होता मात्र हा सिनेमा देखील पुढे ढकलण्यात आला आहे. ११ फेब्रुवारीला सिनेमा रिलीज करण्याची शक्यता आहे.

राधे श्याम ( Radhe Shyam ) 

बाहुबली प्रभासचा राधे श्याम हा बहुप्रतिक्षीत सिनेमाची प्रेक्षक फार वाट पाहत होते. १४ जानेवारीला सिनेमा रिलीज होणार होता मात्र सिनेमा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. अनिश्चित काळासाठी सिनेमाची रिलीड डेट पढे ढकलण्यात आली आहे.


हेही वाचा – Prithviraj Postponed: आरआरआर पाठोपाठ अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ सिनेमाही पुढे ढकलला

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -