घरक्रीडावर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ खूपच मजबूत

वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ खूपच मजबूत

Subscribe

निवड समितीने विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ खूपच मजबूत आहे, असे मत भारताचा सलामीवीर शिखर धवनने व्यक्त केले आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणार्‍या विश्वचषकासाठी सोमवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकची दुसरा यष्टीरक्षक म्हणून निवड झाली. तसेच या संघात अष्टपैलू विजय शंकर आणि रविंद्र जाडेजालाही स्थान मिळाले. हा संघ विश्वचषकात चांगले प्रदर्शन करेल असा धवनला विश्वास आहे.

विश्वचषकासाठीचा आमचा संघ खूपच चांगला आणि मजबूत आहे. आमच्या संघातील सर्व खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही इंग्लंडमध्ये जाऊन विश्वचषकात चांगले प्रदर्शन करू याचा मला विश्वास आहे, असे धवनने सांगितले.

- Advertisement -

मागील वर्षीपर्यंत सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणारा धवन यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या संघाने यंदाच्या मोसमातील ८ पैकी ५ सामने जिंकले आहेत. धवनच्या मते प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि सल्लागार सौरव गांगुलीच्या अनुभवाचा संघाला फायदा मिळत आहे. तो म्हणाला, माजी कर्णधार असलेल्या पॉन्टिंग आणि गांगुली यांच्या अनुभवाचा संघाला खूप फायदा होत आहे. त्यांच्यामुळे संघामध्ये खूप आत्मविश्वास आला आहे. त्याचप्रमाणे आमच्या संघातील युवा खेळाडू हळूहळू परिपक्व होत आहेत, याचाही आम्हाला फायदा मिळत आहे. या मोसमातील आमची कामगिरी खूपच चांगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -