घरक्रीडा१९९२ वर्ल्डकपबाबत चर्चा नाही!

१९९२ वर्ल्डकपबाबत चर्चा नाही!

Subscribe

पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषकाची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. मात्र, त्यांनी दमदार पुनरागमन करत मागील तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. या विश्वचषकातील निकाल आणि पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्त्वात जिंकलेल्या १९९२ विश्वचषकाच्या सामन्यांतील निकाल यात साम्य आहे.

त्यामुळे १९९२ विश्वचषकाप्रमाणेच हा विश्वचषकही पाकिस्तान जिंकणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, आमच्या संघावर ही स्पर्धा जिंकण्याचा फार दबाव नाही आणि आम्ही ड्रेसिंग रूममध्ये १९९२ विश्वचषकाबाबत चर्चा करत नाही, असे पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाझ म्हणाला.

- Advertisement -

आम्ही १९९२ विश्वचषकाबाबत चर्चा करत नाही. आमच्या संघातील सर्वच खेळाडू एकच लक्ष्य गाठण्यासाठी खेळत आहेत. आम्ही या स्पर्धेची चांगली सुरुवात केली नाही. मात्र, आम्ही जिद्दीने खेळून चांगले पुनरागमन केले आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला विश्वचषक जिंकायचा आहे. सर्व खेळाडू यासाठीच खेळत आहेत. शोएब मलिकचा हा अखेरचा विश्वचषक आहे. त्यामुळे त्याच्यासाठीही आम्हाला खास कामगिरी करायची आहे, असे वहाब म्हणाला.

पाकिस्तानच्या पुनरागमनात वहाब, मोहम्मद आमिर आणि शाहिन आफ्रिदी या वेगवान गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले आहे. खासकरून आफ्रिदीने मागील ४ सामन्यांत १० गडी बाद करत अप्रतिम कामगिरी केली आहे. गोलंदाजांबाबत वहाब म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शाहिनवर प्रचंड दबाव होता. मात्र, त्याने तो चांगल्या पद्धतीने हाताळला. मागील काही सामन्यांत त्याने महत्त्वाच्या विकेट मिळवल्या आहेत. आमिर हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्यासमोर खेळताना फलंदाजांवर प्रचंड दबाव असतो. याचा इतर गोलंदाजांनाही फायदा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -