घरदेश-विदेशनजरा सुशीलकुमार शिंदेंकडे

नजरा सुशीलकुमार शिंदेंकडे

Subscribe

काँग्रेस अध्यक्षपद

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदावरून राजीनामा दिलेले राहुल गांधी यांच्या पुन्हा पद न घेण्याच्या ठाम कृतीने निर्माण झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आता सार्‍यांच्या नजरा माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यावर केंद्रित झाल्या आहेत. पक्षाध्यक्ष पद शिंदे यांनी स्वीकारावे म्हणून त्यांच्यावर वाढता दबाव येऊ लागला आहे. स्वत: राहुल गांधी आणि सोनिया गांधींचीही शिंदे यांच्या नावाला पसंती असल्याचे सांगण्यात येते.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. निवडून आलेल्या सर्व खासदारांनी तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनीही राहुल गांधी यांची समजूत काढली. राहुल गांधी हे राजीनामा देण्यावर ठाम राहिले. तेव्हापासुन काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण याबाबत देशभरात चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

अनेक नावांची चर्चा पक्षाध्यक्ष पदासाठी सुरू होती. मात्र विद्यमान परिस्थितीत सत्ताधार्‍यांना तोंड देण्याची ताकद यातल्या अनेकांमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या गळयात टाकण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यावर गांधी कुटुंबियांसह, गांधी कुटुंबाच्या जवळ असलेल्या सल्लागारांनी शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या अध्यक्षांची लवकरच घोषणा केली जाणार अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.

गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल या पदांवर काम केलेल्या सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाला गांधी कुटूंबियांनी देखील पसंती दिली आहे. सुशिलकुमार शिंदे हे यंदा लोकसभा निवडणुकीत सोलापूर येथून पराभूत झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी सुरवातीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आज सुशिलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. शिंदे यांच्या नावावर गांधी कुटूुंबियांनी देखील शिक्कामार्तब केले असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -