घरक्रीडावर्ल्डकप संघात एन्ट्रीसाठी आयपीएलचा उपयोग नाही!

वर्ल्डकप संघात एन्ट्रीसाठी आयपीएलचा उपयोग नाही!

Subscribe

विराट कोहली

भारतीय संघ शनिवारपासून घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामन्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्‍या विश्वचषकाआधी हे भारताचे अखेरचे आंतरराष्ट्रीय सामने आहेत. या मालिकेनंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यामुळे ज्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही, त्यांना विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आयपीएल खूप महत्त्वाची ठरेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, विश्वचषकाच्या संघनिवडीसाठी आयपीएलमध्ये केलेली कामगिरी ग्राह्य धरली जाणार नाही, असे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.

विश्वचषकाचा संघ निवडताना आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार केला जाणार नाही. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे एखाद्या खेळाडूची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होणे मला चुकीचे वाटते. आयपीएल सुरू होण्याआधीच आम्हाला विश्वचषकाच्या संघात कोणाचा समावेश असणार याची कल्पना असली पाहिजे. त्यामुळे आयपीएलमध्ये कोणता खेळाडू कशी कामगिरी करतो याचा विश्वचषकाच्या संघनिवडीवर परिणाम होणार नाही, असे कोहलीने सांगितले.

- Advertisement -

तसेच कोहलीने या एकदिवसीय मालिकेत युवा रिषभ पंतला संधी देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याला संधी देण्यासाठी एका गोलंदाजाला कमी करणार नाही, असेही कोहलीने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -