घरक्रीडाहा तर फक्त एक आकडा !

हा तर फक्त एक आकडा !

Subscribe

कोहलीची ४० व्या शतकाबद्दल प्रतिक्रिया

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ११६ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४० शतकांचा टप्पा गाठणारा कोहली हा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर केवळ दुसरा फलंदाज आहे. मात्र, कोहलीला त्याची ही कामगिरी फारशी खास वाटत नाही.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतर तो म्हणाला, ही कामगिरी चांगली आहे, पण हा (४० शतके) फक्त एक आकडा आहे. मी भारताला सामना जिंकवू शकलो याचा जास्त आनंद आहे. मी जेव्हा फलंदाजी करायला मैदानात उतरतो, तेव्हा संघाची परिस्थिती बिकट असेल, तर संयमाने आणि चिकटीने फलंदाजी करून शेवटपर्यंत खेळण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो.

- Advertisement -

मी या सामन्यात तसे करू शकलो याचा आनंद आहे.

तसेच मोक्याच्या क्षणी २ विकेट घेत सामन्यात रंगत आणणार्‍या जसप्रीत बुमराहचे कोहलीने कौतुक केले. बुमराह एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याने एकाच षटकात दोन विकेट घेतल्यामुळे सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकले. तो आमच्या संघात असणे हे आमचे भाग्य आहे, असे विराट म्हणाला. बुमराहने ४६ व्या षटकात कुल्टर-नाईल आणि पॅट कमिन्सची विकेट घेतली होती.

कोहली दोन संघांतील फरक – कमिन्स

विराट कोहलीचे शतक हा दोन संघांमधील फरक होता, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलदांज पॅट कमिन्सने भारतीय कर्णधाराची स्तुती केली. माझ्यामते कोहली दोन संघांमधील फरक होता. आमच्या फलंदाजांनी काही चांगल्या भागीदारी केल्या. मार्कस स्टोइनिसने ५० धावाही केल्या. पण, आमच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून कोहलीने शेवटपर्यंत फलंदाजी केली. त्याने खूप चेंडू खेळले. कोहलीमुळे भारताच्या धावसंख्येत ४०-५० धावांचा फरक पडला, असे कमिन्स म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -