Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : दोन ज्युडोपटूंची ऑलिम्पिकमधून माघार; 'या' खेळाडूविरुद्ध खेळावे लागू नये...

Tokyo Olympics : दोन ज्युडोपटूंची ऑलिम्पिकमधून माघार; ‘या’ खेळाडूविरुद्ध खेळावे लागू नये म्हणून घेतला निर्णय

एखाद्या खेळाडूविरुद्ध खेळावे लागू नये म्हणून प्रतिस्पर्धी खेळाडूंनी संपूर्ण ऑलिम्पिकमधूनच माघार घेतल्याचे कधी पाहायला मिळत नाहीत. परंतु, असाच प्रकार टोकियो ऑलिम्पिकमध्ये घडला आहे.

Related Story

- Advertisement -

ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा मानली जाते. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळणे प्रत्येकच खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खेळाडू खूप मेहनत घेतात. त्यामुळे एखाद्या खेळाडूविरुद्ध खेळावे लागू नये म्हणून प्रतिस्पर्धी खेळाडूंनी संपूर्ण ऑलिम्पिकमधूनच माघार घेतल्याचे कधी पाहायला मिळत नाहीत. परंतु, असाच प्रकार टोकियो ऑलिम्पिकमध्ये घडला आहे. इस्राईलचा खेळाडू तोहार बुटबुल (Tohar Butbul) याच्याविरुद्ध खेळण्यापेक्षा ऑलिम्पिकमधून माघार घेण्याला दोन खेळाडूंनी पसंती दिली. इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात वाद सुरु असून पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवण्यासाठी या दोन्ही खेळाडूंनी इस्राईलच्या खेळाडूविरुद्ध खेळण्यास नकार दिला. इस्राईल पॅलेस्टाईवर अन्याय करत असल्याचे त्यांचे मत आहे.

ज्युडोमध्ये अशा घटना घडत असतात

अल्जेरियाचा फेथी नौरीन आणि सुदानचा मोहम्मद अब्दालरसूल या दोन खेळाडूंनी पहिल्या दोन फेरीत इस्राईलच्या तोहार बुटबुलविरुद्ध खेळण्यास नकार दिला. सामना सुरु होण्याआधी या दोघांनी आपण ऑलिम्पिकमधून माघार घेत असल्याची घोषणा केली. याविषयी तोहार बुटबुल म्हणाला, ‘ज्युडोमध्ये अशा घटना घडत असतात. त्यामुळे मला काही वेगळे वाटले नाही. केवळ वाट पाहणे आणि पहिल्या सामन्याच्या संधीसाठी थांबणे या व्यतिरिक्त माझ्या हातात काहीच नाही.’

नौरीन आणि त्याचे प्रशिक्षक निलंबित

- Advertisement -

या दोन्ही खेळाडूंनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. परंतु, मोहम्मद अब्दालरसूलने खांद्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीच्या सामन्यात खेळण्यास नकार दिल्याचे बुटबुल म्हणाला. त्याआधी पहिल्या फेरीत बुटबुलचा सामना अल्जेरियाच्या फेथी नौरीनशी होणार होता. मात्र, त्यानेही सामना न खेळता ऑलिम्पिकमधून माघार घेतली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने नौरीन आणि त्याच्या प्रशिक्षकांना निलंबित केले.

- Advertisement -