Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर नवी मुंबई नवी मुंबई न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; डिजिटल माध्यमातून प्रकरणे काढणार...

नवी मुंबई न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; डिजिटल माध्यमातून प्रकरणे काढणार निकाली!

जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा : न्यायधिशा तृप्ती देशमुख- नाईक यांचे आवाहन

Related Story

- Advertisement -

न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी १ ऑगस्ट रोजी बेलापुर येथील वाशी, नवी मुंबई न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पक्षकारांनी लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन न्यायाधीश तृप्ती देशमुख- नाईक यांनी केले आहे. १ ऑगस्ट, २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर लोक न्यायालयात जे पक्षकार हजर राहू शकत नाहीत त्यांचेकरिता ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन लोकन्यायालयामध्ये दिवाणी स्वरुपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरुपाची, वैवाहिक स्वरुपाची, १३८ एन. आय. अॅक्ट चेक संबंधीची दाखल झालेली प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणे जास्तीत जास्त ठेवून १ ऑगस्ट, २०२१ रोजी लोकन्यायालयात सामंजस्य आणि तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याकरिता सर्वांनी सहभाग नोंदवावा याकरिता सर्व पक्षकार, विधीज्ञ यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

या लोक अदालतीमध्ये ज्या पक्षकारांना सदर दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदविता येत नसेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करावा त्याकरिता आपला मोबाईल कंमांक तसेच इमेल आयडी विधीज्ञांमार्फत अथवा स्वतः उपस्थित करुन द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे. कोविड- १९ सारख्या गंभीर साथीच्या आजारात बरीच प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे पक्षकारांना त्यांची प्रकरणे सामंजस्याने आणि तडजोडीने मिटविण्याची प्रत्यक्ष संधीच या लोकन्यायालयाने उपलब्ध करुन दिली आहे. याचा लाभ सर्वांनी घेतल्यास त्यांचा वेळ, पैसा, श्रम तर वाचेलच पण मनाजोगता न्याय मिळेल. तसेच २६ ते ३१ पर्यंत पक्षकार व विधीज्ञ हे ऑनलाईन आपल्या प्रकरणतील समस्यांवर न्यायालयासामोर चर्चा करुन सामोपचाराने प्रकरण मिटवू शकतात. म्हणजेच त्यांना केवळ १ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या दिवशी नव्हे तर त्यादिवसापर्यंत चर्चेला वेळ मिळू शकेल. त्याचप्रमाणे ज्या आरोपींचे गुन्हे तडजोडीपात्र आहेत अथवा किरकोळ स्वरुपाचे आहेत ते आरोपी गुन्हा कबुली देवू शकतात व फिर्यादी ऑनलाईन पध्दतीने त्याची फिर्याद मागे घेऊन प्रकरण संपवू शकतो.

- Advertisement -

वादपूर्व प्रकरणांचा बँक, पतसंस्था, वीजमंडळ, इंटरनेट, फोन व मोबाईन संस्था लाभ घेऊन त्यांच्या ग्राहकांसोबत होणारे वाद संपुष्टात आणू शकतील. त्यांना त्यासाठी कोणतेही न्यायालयीन किंवा इतर शुल्क देण्याची आवश्यकता नाही तसेच ग्राहक देखील त्यांची बाजू सांगून बीले नियमित करुन घेऊ शकतात. तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा समिती अध्यक्षा तृप्ती देशमुख – नाईक यांनी केले आहे.


- Advertisement -