शिल्पा शेट्टी देणार राज कुंद्राला घटस्फोट?

राज आणि शिल्पा यांच्या नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह

Shilpa Shetty to divorce Raj Kundra?
शिल्पा शेट्टी देणार राज कुंद्राला घटस्फोट?

पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  हीचा पती राज कुंद्राला (Raj Kundra)  अटक झाल्यापासून शिल्पा आणि राज दोघेही चर्चेचा विषय बनले आहेत. आज राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणानंतर राज आणि शिल्पा यांच्या नातेसंबंधावर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. राज कुंद्राला अटक केल्यापासून शिल्पा राजच्या पाठिशी उभी आहे. माझा पती निर्दोष असल्याचे शिल्पाने चौकशीदरम्यान दरम्यान अनेकदा सांगितले. असे असले तरी सध्या सर्वत्र शिल्पा राज कुंद्राला घटस्फोट देणार आसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिल्पा ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. शिल्पाशी लग्न करण्याआधी राजचा घटस्फोट झाला होता. आता दुसरी पत्नी शिल्पा देखील राजला घटस्फोट देत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत.

शिल्पा शेट्टीच्या घटस्फोटाच्या चर्चा या शिल्पाने तिच्या आईला मी राजसोबत घटस्फोट घेत असल्याच्या मेसेजमुळे होत आहे. शिल्पाने स्वत:याचा खुलासा ‘सुपर डान्सर ३’च्या मंचावर केला होता. शिल्पा राज कुंद्रासोबत घटस्फोट घेतल्याचा प्रँक तिच्यासोबत करण्यात आला होता असे शिल्पाने सांगितले होते. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर याच घटनेचा संदर्भ लावून शिल्पा राज कुंद्रासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

नेमकं काय झालं होतं?

एकदा शिल्पाच्या शेट्टीच्या फोनवरुन तिच्या आईला ‘माझे राजसोबत मोठे भांडण झाले असून मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे’, असा मेसेज गेला. खरंतर फिल्ममेकर अनुराग बासुने तिच्यासोबत प्रँक केला होता. शिल्पाचा मेसेज वाचून तिच्या आईला देखील धक्का बसला होता. मात्र नंतर शिल्पाने आईला फोन करुन हा प्रँक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कधी माझ्या फोनवरुन असे कोणतेही मेसेज आले तर प्रँक असू शकतात असेही तिने आईला सांगितले.


हेही वाचा – Video: गणेश आचार्य आणि त्याच्या मुलीचा रोमँटिक डान्स पाहून व्हाल थक्क