घरक्रीडाअरेरे, रवी शास्त्रींची जीभ घसरली; म्हणाले...

अरेरे, रवी शास्त्रींची जीभ घसरली; म्हणाले…

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाकडून अशाप्रकारचं वक्तव्य लज्जास्पद असल्याच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटत आहेत.

नुकताच भारतीय संघाने अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघाची मान उंचावली गेली खरी मात्र, उत्साहाच्या भरात संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कॅमेरासमोर काय बोलावं याच भानच राहिलं नाही आणि थेट कॅमेरासमोर शास्त्री बेताल वक्तव्य करुन मोकळे झाले. भारताच्या विजयाबाबत बोलतेवेळी शास्त्री यांची जीभ अशी काही घसरली, की सध्या ते इंटरनेटवर ट्रोलिंगची शिकार झाले आहेत. ‘ऑस्ट्रेलियाच्या शेपटानं कडवट झुंज दिली आणि भारताचा विजय अवघड केला’, असं सांगताना रवी शास्त्री यांनी गल्लीत बोलली जाणारी भाषा वापरल्याचं या व्हिडिओमधून समोर आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाकडून अशाप्रकारचं वक्तव्य लज्जास्पद असल्याच्या प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटत आहेत. ऐका काय म्हणाले रवी शास्त्री :

 

- Advertisement -

दरम्यान, अॅडलेडमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाला पेलवता आले नाही. अवघ्या २९१ धावांमध्ये त्यांचा दुसरा डाव आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी सामन्यात संयमी फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाने केलेल्या फास्ट बॉलींगसमोर कांगारुंची झुंज अपयशी ठरली. चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावा करत, सामनावीर हे पद पटकवले. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्रींनी केलेलं हे बेताल वक्तव्य कोणत्या नव्या वादाला तोंड फोडतं? हे पाहावं लागेल.

- Advertisement -

शास्त्रींवर MEMES ची बरसात…

एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीने वादग्रस्त वक्तव्य केलं इंटरनेटवर त्याला हमखास ट्रोल केलं जातं. त्या व्यक्तीने केलेल्या वक्तव्यावरुन त्याच्यावर टीका करण्यासाठी किंवा त्याची खिल्ली उडवण्यासाठी, आजकाल Memes बनवण्याचा ट्रेंड आहे. रवी शास्त्रींवरही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अशाच काही Memes ची बरसात होत आहे.

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -