घरक्रीडाDelhi Shooting World Cup : विजयवीर, तेजस्विनीची सुवर्ण कामगिरी 

Delhi Shooting World Cup : विजयवीर, तेजस्विनीची सुवर्ण कामगिरी 

Subscribe

शुक्रवारी विजयवीरने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या एकेरीत रौप्यपदक पटकावले होते.

भारताच्या विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी या जोडीने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. विजयवीर आणि तेजस्विनी यांनी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अव्वल स्थानासाठी झालेल्या लढतीत विजयवीर आणि तेजस्विनीने भारताच्याच गुरप्रीत सिंग आणि अशोक अभिज्ञा पाटील यांच्यावर ९-१ अशी मात केली. त्याआधी दुसऱ्या पात्रता फेरीत गुरप्रीत आणि पाटील यांनी ३७० गुणांसह अव्वल, तर विजयवीर आणि तेजस्विनी यांनी ३६८ गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

- Advertisement -

भारत अव्वल स्थानावर

शुक्रवारी विजयवीरने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या एकेरीत रौप्यपदक पटकावले होते. शनिवारी कॅनन चेनै आणि श्रेयसी सिंह यांना मात्र पदकाने हुलकावणी दिली. त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दिल्ली येथे सुरु असलेल्या या विश्वचषकात भारतीय नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत १३ सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण २७ पदके जिंकली आहे. त्यामुळे पदकतक्त्यात भारत अव्वल स्थानावर आहे.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -