घरमुंबईमुंबईकरांचा घामटा निघणार, पारा ४० अंश पार करणार

मुंबईकरांचा घामटा निघणार, पारा ४० अंश पार करणार

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा दडाखा जाणवत आहेत. अनेक भागात तापमान ४० अंशावर पोहचणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह विदर्भात नागरिकांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मुंबईतही नागरिक घामाघूम होऊ लागले आहेत. दुपारच्या उन्हात मुंबईकर सावली किंवा लिंबाच्या रसाचा आसरा घेताना दिसत आहेत. यातच मुंबईत शनिवारी दुपारी उष्णतेचा पारा ४० अंशावर पोहचला असून, पुढील काही तासांत आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याचे ज्येष्ठ तज्ज्ञ के.एस, होसाळीकर यांनी दिली आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली.

मार्च महिन्याच्या २७ तारखेला मुंबईत तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला. त्यामुळे मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या तापमानाची नोंद १९५६ साली झाली होती. त्यामुळे राज्यात अनेक वर्षानंतर उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. याचा परिणाम आता मुंबईच्या तापमानावरही दिसत आहे. यावर मुंबईकरांनी या उन्हापासून बचाव करत स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन के.एस. होसाळीकर यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईकत एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असतानाच तीव्र उन्हाचे चटकेही मुंबईकरांना सोसावे लागणार आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -