घरक्रीडाविराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; आयसीसीने केले सन्मानित

विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू; आयसीसीने केले सन्मानित

Subscribe

विराटने 'सर गारफिल्ड सोबर्स' या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीची सोमवारी आयसीसीचा दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. त्यामुळे विराटने ‘सर गारफिल्ड सोबर्स’ या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची घोषणा केली. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके केली असून यापैकी ६६ शतके त्याने मागील दशकात झळकावली आहेत.

तसेच या काळात सर्वाधिक अर्धशतके (९४), सर्वाधिक धावा (२०३९६) आणि सर्वाधिक सरासरी (५६.९७) विराटच्याच नावे आहे. ३२ वर्षीय विराटने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२०४० धावा, कसोटीत ७३१८ आणि टी-२० क्रिकेटमध्ये २९२८ धावा केल्या असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा तो जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -