घरदेश-विदेशयेत्या नव्या वर्षात ५६ दिवस बँक असणार बंद, पाहा कोणते ते दिवस

येत्या नव्या वर्षात ५६ दिवस बँक असणार बंद, पाहा कोणते ते दिवस

Subscribe

नव्या वर्षाच्या आगमनासाठी सर्वजण सज्ज आहे. या वर्षात अनेकांनी नवनवे संकल्प केले असतील. तसेच, आगामी महिन्यात काय काय काम करायचे आहेत, याची यादीदेखील तुम्ही केली असेल. मात्र, येणाऱ्या नव्या वर्षात तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही सतर्क व्हायला हवं आणि त्यानुसार तुम्हाला नियोजन करावे लागणार आहे. कारण यंदा नव्या वर्षात देशातील बँकांना तब्बल ५६ दिवस सुट्या असणार आहे. 2020 हे सरते वर्ष आपला निरोप घेत असताना काही दिवसांतच नवं 2021 हे वर्ष सुरू होणार आहे. या सरत्या वर्षाचे काही दिवस बाकी असताना बँकांच्या सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली असून या यादीनुसार, नव्या वर्षात 50 हून अधिक दिवस बँका बंद राहणार आहेत.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनुसार, बँका रविवार व्यतिरिक्त दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व सुट्या वेगवेगळ्या राज्यानुसार ठरविल्या गेल्या असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या सुट्या संपूर्ण देशातील बँकासाठी लागू असतील तर राज्या-राज्यांनुसार विशेष सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

जानेवारी 2021

  •  जानेवारी 1, शुक्रवार – नवीन वर्ष
  •  जानेवारी 2, शनिवार – न्यू ईयर हॉलिडे
  •  जानेवारी 9, दुसरा शनिवार
  •  जानेवारी 11, सोमवार – मिशनरी डे
  •  जानेवारी 14, गुरुवार – मकर संक्रांती आणि पोंगल
  •  जानेवारी 15 ला तिरुवल्लुवर डे, काही राज्यांमध्ये सुट्टी
  •  जानेवारी 23, चौथा शनिवार
  •  जानेवारी 26, मंगळवार – प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021

  •  फेब्रुवारी 13, दुसरा शनिवार
  •  फेब्रुवारी 16, मंगळवार – वसंत पंचमी
  •  फेब्रुवारी 27, चौथा शनिवार – गुरु रविदास जयंती

मार्च 2021

  •  मार्च 11, गुरुवार – महाशिवरात्री
  •  मार्च 13, दुसरा शनिवार
  •  मार्च 27, चौथा शनिवार
  •  मार्च 29, सोमवार – होळी

एप्रिल 2021

  •  एप्रिल 2, शुक्रवार – गुड फ्रायडे
  •  एप्रिल 8, गुरुवार – बुद्धपोर्णिमा
  •  एप्रिल 10, दुसरा शनिवार
  •  एप्रिल 14, गुरुवार – बैसाखी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  •  एप्रिल 21, बुधवार – राम नवमी
  • एप्रिल 24, चौथा शनिवार
  •  एप्रिल 25, रविवार – महावीर जयंती

मे 2021

  •  मे 1, शनिवार, कामगार दिन
  •  मे 8, दुसरा शनिवार
  •  मे 12, बुधवार – ईद-उल-फितर
  •  मे 22, दुसरा शनिवार

जून 2021

  •  जून 12, दुसरा शनिवार
  •  जून 26, चौथा शनिवार

जुलै 2021

  •  जुलै 10, दुसरा शनिवार
  •  जुलै 20, मंगळवार – बकरी ईद
  •  जुलै 24, चौथा शनिवार

ऑगस्ट 2021

  •  ऑगस्ट 10, मंगळवार- मोहरम
  •  ऑगस्ट 14, दुसरा शनिवार
  •  ऑगस्ट 15, रविवार – स्वातंत्र्यदिन
  •  ऑगस्ट 22, रविवार – रक्षाबंधन
  •  ऑगस्ट 28, चौथा शनिवार
  •  ऑगस्ट 30, सोमवार – जन्माष्टमी

सप्टेंबर 2021

  •  सप्टेंबर 10, शुक्रवार – गणेश चतुर्थी
  •  सप्टेंबर 11, शनिवार – दुसरा शनिवार
  •  सप्टेंबर 25, शनिवार – चौथा शनिवार

ऑक्टोबर 2021

  • ऑक्टोबर 2, शनिवार – गांधी जयंती
  •  ऑक्टोबर 9, दुसरा शनिवार
  •  ऑक्टोबर 13, बुधवार – महाअष्टमी
  •  ऑक्टोबर 14, गुरुवार – महानवमी
  • ऑक्टोबर 15, शुक्रवार – दसरा
  •  ऑक्टोबर 18, सोमवार – ईद-ए-मिलान
  •  ऑक्टोबर 23, चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021

  •  नोव्हेंबर 4, गुरुवार – दिवाळी
  •  नोव्हेंबर 6, शनिवार – भाऊबीज
  •  नोव्हेंबर 13 – दुसरा शनिवार
  •  नोव्हेंबर 15, सोमवार – दिपावली हॉलीडे
  •  नोव्हेंबर 19, शुक्रवार – गुरुनानक जयंती
  •  नोव्हेंबर 27 – चौथा शनिवार

डिसेंबर 2021

  • डिसेंबर 11 – दुसरा शनिवार
  • डिसेंबर 25 – चौथा शनिवार आणि ख्रिसमस
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -