घरक्रीडाWimbledon : भारतीय जोड्यांच्या ऐतिहासिक सामन्यात सानिया मिर्झा-रोहन बोपण्णाची बाजी

Wimbledon : भारतीय जोड्यांच्या ऐतिहासिक सामन्यात सानिया मिर्झा-रोहन बोपण्णाची बाजी

Subscribe

कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेत दोन भारतीय जोड्यांमध्ये सामना होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भारताच्या अनुभवी जोडीला विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत मिर्झा आणि बोपण्णा या जोडीने रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना या भारताच्याच जोडीवर ६-२, ७-६ (७-५) अशी सरळ सेटमध्ये मात केली. भारताच्या दृष्टीने हा सामना ऐतिहासिक ठरला. कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेत दोन भारतीय जोड्यांमध्ये सामना होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यात मिर्झा आणि बोपण्णा या अनुभवी जोडीला बाजी मारण्यात यश आले.

मिर्झा आणि बोपण्णाचा उत्कृष्ट खेळ  

पहिल्या फेरीच्या पहिल्या सेटमध्ये मिर्झा आणि बोपण्णाने उत्कृष्ट खेळ केला. रामनाथन आणि अंकिता रैनाला त्यांना फारशी टक्कर देता आली नाही. त्यामुळे मिर्झा आणि बोपण्णाने पहिला सेट ६-२ असा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये रामनाथन आणि रैनाने दमदार पुनरागमन केले. या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे टाय-ब्रेकर खेळवण्यात आला. मिर्झा आणि बोपण्णाने आपला अनुभव पणाला लावत टाय-ब्रेकर ७-५ असा जिंकत हा सामनाही जिंकला.

- Advertisement -

रामकुमार रामनाथनचे पदार्पण 

रामकुमार रामनाथनसाठी हा सामना खास ठरला. ग्रँड स्लॅम स्पर्धेतील हे त्याचे पदार्पण ठरले. त्याने याआधी तब्बल २१ वेळा पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यात त्याला यश आले नाही. आता अंकिता रैनाच्या साथीने तो मिश्र दुहेरीत खेळला. मात्र, या नव्या जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -