घरक्रीडाPAK vs AUS: ऑस्ट्रेलियानं कायम ठेवला २४ वर्षांचा विक्रम; पाकिस्तानात जिंकली मालिका

PAK vs AUS: ऑस्ट्रेलियानं कायम ठेवला २४ वर्षांचा विक्रम; पाकिस्तानात जिंकली मालिका

Subscribe

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील किसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लाहौरमध्ये झाला. या कसोटी सामान्यात ऑस्ट्रेलियानं ११५ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तान विरुद्धचा तिसरा सामाना जिंकत ऑस्ट्रेलियानं १-० अशी आघाडी घेतली.

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील किसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना लाहौरमध्ये झाला. या कसोटी सामान्यात ऑस्ट्रेलियानं ११५ धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तान विरुद्धचा तिसरा सामाना जिंकत ऑस्ट्रेलियानं १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तानात खेळण्यासाठी गेला होता. ३ सामनच्या या कसोटी मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित ठरला होता. मात्र निर्णायक समाना जिंकत ऑस्ट्रेलियानं आपला २४ वर्षांचा विक्रम कायम ठेवला.

पाकिस्तानविरुद्ध लाहोरच्या गद्दाफी स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या अखेरच्या कसोटी मालिकेतील पाचवा दिवशी रोमांचक होता. सामान्याच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या दिवशी टी टाईमनंतर ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाकिस्तानचा दुसरा डाव २३५ धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक (२७), अजहर अली (17), इमाम उल हक (७०) फवाद आलम (११) आणि मोहम्मह रिझवानने शून्यावर आपली विकेट गमावली.

- Advertisement -

लंच ब्रेकपूर्वी पाकिस्तानचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल, असं वाटत होते. परंतु, फवाद आलम आणि मोहम्मद रिझवानच्या विकेट्सनं पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. शिवाय टी ब्रेकनंतर बाबर आझमही ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत बाद झाला. या सामान्यात ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायननं ५ विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठे बदल झाले आहेत. ही कसोटी मालिका हारल्यामुळं पाकिस्तानला गुणतालिकेतील नुकसान झालं आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळं भारताला फायदा झाला आहे.

- Advertisement -

या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळं ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी आला आहे. या कसोटी मालिकेनंतर भारताचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे.


हेही वाचा – IPL 2022: क्रिकेटप्रेमींसाठी रिलायन्स जिओचा स्वस्तात प्लान; एवढ्या पैशात लुटा क्रिकेट पाहण्याची मज्जा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -