घरमहाराष्ट्रतो रिसॉर्ट माझा नाही, सोमय्या मला बदनाम करतायत, अनिल परबांचा पलटवार

तो रिसॉर्ट माझा नाही, सोमय्या मला बदनाम करतायत, अनिल परबांचा पलटवार

Subscribe

किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का?, की तोडायला जाणार आहेत. पोलीस आणि ते बघून घेतील. कायद्याचं उल्लंघन झाल्यास पोलीस आपलं काम करतील, असंही त्यांनी सांगितलंय.

मुंबईः सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की हा रिसॉर्ट माझा नाही. या रिसॉर्टच्या बाबतीत सगळ्या ज्या काही चौकशी करायच्या होत्या, त्या झालेल्या आहेत, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हणालेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. सगळी कागदपत्रं तपासून झालेली आहेत. वेगवेगळ्या एजन्सीजने कागदपत्र तपासून झालेली आहेत. या रिसॉर्टशी माझा संबंध नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे, ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही अनिल परब म्हणाले आहेत.

त्याबाबतीत मी कोर्टात देखील याचिका दाखल केलेली आहे. परंतु किरीट सोमय्या वारंवार हा रिसॉर्ट माझाच असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कागदोपत्री त्यांनी ते सिद्ध करावं. किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का?, की तोडायला जाणार आहेत. पोलीस आणि ते बघून घेतील. कायद्याचं उल्लंघन झाल्यास पोलीस आपलं काम करतील, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

दुसरीकडे नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही, उद्धव ठाकरेंचे पोलीस उद्धट आहेत, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या दापोलीच्या दिशेने रवाना झालेत. शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्याच्या उद्देशाने भाजपचे नेते किरीट सोमय्या आता दापोलीकडे रवाना झालेत. ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’ असा नारा देत किरीट सोमय्या दापोलीकडे जात असतानाच पोलिसांनी त्यांना कशेडी घाटात अडवले. त्यावेळी काही किरीट सोमय्या आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे तेरी दादागिरी नही चलेगी म्हणत जोरदार घोषणबाजीही केली. विशेष म्हणजे पोलिसांनी या सर्व प्रकारावर बोलण्यास नकार दिला. किरीट सोमय्या हाती प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना झाले असून, खेडे ते दापोलीला १०० गाड्यांचा ताफा निघालाय. काल शिवसेनेचे नेते संजय कदम यांनी सोमय्यांना दापोलीत पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अलिबागमधील कोर्लईमध्ये झालेला शिवसेना-भाजप संघर्ष दापोलीत पाहायला मिळणार आहे.


हेही वाचाः नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही; कशेडी घाटात सोमय्या-पोलीस आमनेसामने

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -