घरक्रीडाIPL 2022: क्रिकेटप्रेमींसाठी रिलायन्स जिओचा स्वस्तात प्लान; एवढ्या पैशात लुटा क्रिकेट पाहण्याची...

IPL 2022: क्रिकेटप्रेमींसाठी रिलायन्स जिओचा स्वस्तात प्लान; एवढ्या पैशात लुटा क्रिकेट पाहण्याची मज्जा

Subscribe

आयपीएल स्पर्धेचे रंगतदार सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीदेखील उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेटच्या चाहत्यांना सामना लाइव्ह पाहण्यासाठी मोबाईल रिचार्ज, इंटरनेट रिचार्ज मारायला सुरूवात केली आहे. अशातच या क्रिकेचप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन लॉन्च केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वाची सुरूवात आजपासून होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. आयपीएल स्पर्धेचे रंगतदार सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमीदेखील उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक क्रिकेटच्या चाहत्यांना सामना लाइव्ह पाहण्यासाठी मोबाईल रिचार्ज, इंटरनेट रिचार्ज मारायला सुरूवात केली आहे. अशातच या क्रिकेचप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन लॉन्च केला आहे. २७९ रुपयांचा हा नवीन क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन रिलायन्स जिओने लॉन्च केला आहे.

 २७९ रुपयांचा रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लानमध्ये १५ जीबी मोबाईल डेटा उपलब्ध असेल. हा अॅड-ऑन पॅक असल्यानं व्हॉईस कॉलिंग मिळणार नाही. इंटरनेट डेटासह या प्लॅनमध्ये एक वर्षाचे Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असणार आहे. नवीन प्रीपेड क्रिकेट अॅड-ऑन योजना MyJio अॅपद्वारे उपलब्ध आहे. जिओचा २७९ रुपयांचा क्रिकेट अॅड-ऑन प्लॅन सध्या फक्त निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. रिलायन्स जिओ क्रिकेट अॅड-ऑन प्रीपेड २७९ रुपयांचा प्लॅन युजर्सच्या विद्यमान प्लॅनची ​​वैधता संपेपर्यंत सक्रिय असेल.

- Advertisement -

कंपनी सध्या ७ वेगवेगळ्या क्रिकेट प्लॅन ऑफर करत आहे. यातील सर्वात स्वस्त प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरू होतो असून, सर्वात महागड्या प्लॅनची ​​किंमत ३,११९ रुपये आहे. रिलायन्स जीओच्या या सर्व योजना Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मोफत देतात. यंदाच्या हंगामात १० संघ स्पर्धेत असणार आहेत. आयपीएल २०२२ स्पर्धा २९ मे पर्यंत असणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील उत्कंठा वाढवणारे सामने पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर आहे. चालता फिरता मॅच बघता यावी यासाठी चांगल्या प्लानच्या शोधात आहेत.

रिलायन्स जीओचे रिचार्ज

- Advertisement -
  • ४९९ रुपयांच्या क्रिकेट प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस दैनिक मर्यादेसह दररोज २ जीबी मोबाइल डेटा देते.
  • ५५५ रुपयांच्या क्रिकेट प्लॅनची ​​वैधता ५५ दिवस आहे आणि ५५ जीबी इंटरनेट डेटासह येतो. प्लॅनमध्ये एसएमएस किंवा कॉलची सुविधा नाही.
  • ६०१ रुपयांच्या क्रिकेट प्रीपेड प्लॅनची ​​वैधता २८ दिवसांची आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह ९० जीबी एकूण इंटरनेट डेटा आणि १०० एसएमएस प्रतिदिन येतो.
  • ६५९ रुपयांच्या क्रिकेट प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी मोबाइल डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता ५६ दिवसांची आहे आणि यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग डेटा उपलब्ध आहे.
  • ५६ दिवसांची वैधता असलेला ७९९ रुपयांचा प्लान आहे. यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज २ जीबी मोबाइल डेटा येतो.
  • १,०६६ रुपयांचा प्रीपेड प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसाठी १७३ जीबी मोबाईल डेटासह येतो. दररोज १०० एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते.
  • ३,११९ रुपयांच्या क्रिकेट प्रीपेड प्लानची ​​वैधता ३६५ दिवस आहे आणि दररोज २ जीबी मोबाइल डेटासह येतो. प्लान अंतर्गत, युजर्संना व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह १० जीबी डेटाचा लाभ देखील मिळेल.

हेही वाचा – IPL 2022: आयपीएलमध्ये आजपासून दस का दम, CSK आणि KKR भिडणार आमनेसामने

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -