घरटेक-वेक5G Smartphone: १५ हजारांहून कमी किंमतीत विकत घ्या 5G स्मॉर्टफोन, पहा संपूर्ण...

5G Smartphone: १५ हजारांहून कमी किंमतीत विकत घ्या 5G स्मॉर्टफोन, पहा संपूर्ण लिस्ट

Subscribe

मिड आणि बजेट रेंजमध्ये 5G फोन बाजारात उपलब्ध

बाजारात आता 5G फोन येण्यास सुरूवात झालीय. सुरुवाताली 5Gफोन प्रिमियम रेंजमध्ये मिळत होते. मात्र आता मिड आणि बजेट रेंजमध्ये 5G फोन बाजारात उपलब्ध झाले आहेत. भारतात लवकरच 5जी नेटवर्कची कमर्शियल सुरुवात होणार आहे. त्यामुळे तेव्हा नवीन फोन खरेदी करावा लागणार नाही. 5 जी फोन खरेदी करण्यामागे हा महत्त्वाचा फायद आहे. यावेळी १५ हजारांहून कमी किंमतीत 5जी फोन्स उपब्ध झाले आहेत. १५ हजारांहून कमी किंमतीमधील 5जी फोनची संपूर्ण लिस्ट पहा. (Buy 5G smartphone less than Rs 15,000, see full list)

Realme 8 5G

- Advertisement -

Realme 8 5G हा स्मॉर्ट फोन बाजारात केवळ १३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये 4GB + 64GB वेरिएंट आहे. हा स्मॉर्टफोन सुपरसोनिक ब्लॅक आणि सुपसोनिक ब्लू या दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. हा फोन realme UI 2.0 एंड्रॉइड बेस्ट आहे. 90Hz रिफ्रेश रेटसोबतच ६.६ इंचाचा फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे. MediaTek Dimensity700 चा प्रोसेसर देण्यात आलाय. या फोनचा कॅमेरा पहायला गेले तर 48MPचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. त्यात 16 MP सेल्फी कॅमेरा आणि ५०००mAhची बॅटरी देण्यात आलीय.

Oppo A53s 5G

- Advertisement -

Oppo A53s 5G स्मार्टफोन १४.९९० रुपयांना उपलब्ध आहे. यात ग्राहकांना 6GM + 128GB वेरिएंट देण्यात आला आहे. हा फोन क्रिस्टल ब्लू आणि इंक ब्लॅक कलर अशा दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या फिचर्सचा विचार केला असता हा फोन colorOS 11. एंड्रॉइड बेस्ट आहे. तर 6.52 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आलाय. MediaTek Dimensity700 प्रोसेसर, 13MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAhची बॅटरी देण्यात आलीय.

Poco M3 Pro 5G

13,999 रुपयांनी Poco M3 Pro 5G या स्मॉर्ट फोनची सुरुवात होते. यात ग्राहकांना 4GM + 68GB वेरिएंट देण्यात आला आहे. हा फोन सध्या कूल ब्लू,पावर ब्लॅक आणि पोको येलो कलरमध्ये उपलब्ध आहे. हा फोन एंड्रॉइड ११ बेस्ड आहे. त्याचप्रमाणे यात 90Hz रिफ्रेश रेटसोबतच 6.5 इंचाचा HD+ होल पंच डिस्प्ले देण्यात आलाय. तसेच Dimensity700 प्रोसेसर,Mali-G57 GPU देण्यात आलाय. Poco M3 Pro 5G स्मॉर्टफोनला 48 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय.  8MP सेल्फी कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आलीय.


हेही वाचा – भारतात ‘या’ दिवशी लाँच होणार Samsung Galaxy F22; 48 MP कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर

 

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -