घरमहाराष्ट्रनाशिकशहर बसची ट्रायल रन, नाशिककरांचा चांगला प्रतिसाद

शहर बसची ट्रायल रन, नाशिककरांचा चांगला प्रतिसाद

Subscribe

नऊ मार्गांवर धावल्या बसेस, जीपीएससह संगणकीय प्रणालीची चाचपणी

नाशिक महापालिकेमार्फत शहर बससेवा सुरू करण्यात येत असून या बससेवेची आजपासून ट्रायल रन सुरू करण्यात आली. शहरातील नऊ मार्गांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या या चाचणी दरम्यान तिकिट प्रणाली, संगणकीय प्रणालीची चाचपणी करण्यात आली. तसेच बसचालकांना बस थांब्यांची ओळख करून देण्यात आली.
या चाचपणी दरम्यान शहरातून धावणार्‍या हिरव्या रंगाच्या या बसेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. विशेष म्हणजे, या ट्रायल रन दरम्यान प्रवाश्यांना मोफत सेवा देण्यात आली. सकाळी आठ वाजता तपोवन डेपोतून पाच तर नाशिकरोड डेपोतून चार बसेस सोडण्यात आल्या. दोन्ही ठिकाणांहून नाशिकरोड, पाथर्डी, बोरगड, तपोवन, पंचवटी, सातपूर या भागात या बस धावल्या. या ट्रायल रन दरम्यान तिकिट मशीन, संगणकीय तपासणी तसेच तांत्रिक तपासणी करण्यात आली. सीएनजी आणि डिझेल या बसेसचा यात समावेश होता.

हे आहेत मार्ग!

नाशिकरोड ते तपोवन मार्गे बिटको, द्वारका, शालिमार, सीबीएस, पंचवटी. नाशिकरोड ते निमाणीमार्गे जेलरोड टाकी, सैलानी बाबा, नांदूरगाव, नांदूरनाका, तपोवन. नाशिकरोड ते अंबडगावमार्गे द्वारका, महामार्ग, लेखानगर, गरवारे. नाशिकरोड ते बारदानफाटामार्गे द्वारका, कॉलेज रोड, सातपूर, व्हीआयपी, कार्बननाका. तपोवन ते बारदान फाटामार्गे सिव्हील, सातपूर अशोकनगर श्रमिकनगर. तपोवन ते पाथर्डी गावमार्गे द्वारका, नागजी, इंदिरानगर, वनवैभव. सिम्बॉयसिस कॉलेज ते बोरगडमार्गे शिवाजी चौक, लेखानगर, महामार्ग, म्हसरूळ. बोरगड, तपोवन सिंम्बॉयसिस कॉलेजमार्गे पवननगर, उत्तमनगर. तपोवन ते भगूरमार्गे शालिमार, द्वारका, बिटको, देवळाली कॅम्प.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -