घरटेक-वेकऑनलाईन गेमिंगच्या शर्यतीत भारत मागे?

ऑनलाईन गेमिंगच्या शर्यतीत भारत मागे?

Subscribe

काही वर्षांपूर्वी भारतात गेम्स खेळण्यासाठी लोकांना डॉलर्समध्ये पेमेंट करावे लागत होते. त्यामुळे ऑनलाइन गेम्सची किंमत भारताला युएसच्या चलनात द्यावी लागत होती. यासाठी अनेकांनी गेम्सना पाठ दाखवली.

आताच्या काळात दैनंदिन जीवनात इंटरनेटचा वापर फार वाढला आहे, Jioच्या फास्ट नेटमुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम तसेच यू ट्यूबवरील व्हिडिओ बघण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. त्याबरोबरच मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्याचासुद्धा ट्रेंड वाढत आहे. PUBG (Player Unknown’s Battle grounds) सारखे गेम मोठ्या प्रमाणावर खेळताना पाहायला मिळतात.

परंतु भारत प्रोसेसर, ग्राफिक कार्ड आणि इतर कॉम्प्युटर कंपोनंट्स अशा वस्तूंवर लागणार्‍या टॅक्समुळे कॉम्प्युटर गेमिंग, कंसोल गेमिंग मात्र जगाच्या शर्यतीत मागे पडले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे भारतातील इंटरनेट सेवा. आता कुठे भारतात Jio ने सुरुवात केल्यावर इत्तर ISP कंपन्यानी इंटरनेटचे चार्जेस कमी केले. काही गेम्स 1 GB/ DAY चा वापर कॉम्प्युटर गेमिंगसाठी करतात.

- Advertisement -

mobile gaming

अशा गेम खेळणार्‍या मुलांना इंटरनेट कॅफे परवडत नाही. अशी मुले गेम्सची पायरसी करतात. पायरसी केलेले हे गेम्स ते मित्रांना पाठवतात व स्वतःही खेळतात. दुसरीकडे ज्यांना पायरसी करायची नाही व गेम्स डेव्हलपर्सला सपोर्ट करायचा आहे, अशी मुले STEAM नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करतात. हे सॉफ्टवेअर लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेत गेम्स उपलब्ध करुन देते. येथे काही गेम्स फ्रीदेखील उपलब्ध आहेत.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी भारतात गेम्स खेळण्यासाठी लोकांना डॉलर्समध्ये पेमेंट करावे लागत होते. त्यामुळे ऑनलाइन गेम्सची किंमत भारताला युएसच्या चलनात द्यावी लागत होती. यासाठी अनेकांनी गेम्सना पाठ दाखवली. अशा गेम्सला आकर्षित करण्यासाठी STEAM (https://store.steampowered.com/) गेमिंग साईटने प्रत्येक देशाच्या चलनात पैसे आकारण्यास सुरुवात केली. भारतात डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यतिरीक्त E wallets – Paytm पेमेंटची सुविधाही सुरू केली. याचबरोबर लोकांना आकर्षित करण्यासाठी या साईटवर अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या साईट्सवर मिळणारे डिसकाऊंटही देण्यात आले.

मागील सात दिवसांमध्ये STEAM साईटवर ९२२.१TB डाटा गेम्स आणि सॉफ्टवेअर भारताकडून वापरण्यात आले आहे. जगात वापरल्या जाणार्‍या डेटाच्या तुलनेत हा डाटा फक्त ०.३ टक्के इतका आहे. तर चीनद्वारे ७५.४PB इतका डाटा डाऊनलोड केला गेला. जगात वापरल्या जाणार्‍या एकूण डेटापैकी २१.५ टक्के चीनमध्ये वापरला जातो. या Stat मुळे ऑनलाइन गेमिंगमध्ये आपल्या भारताचा सहभाग दिसून येतो.

Rohit Adsurhttps://www.mymahanagar.com/author/rohit/
Tech Enthusiast | Geek! | I'm a Geek who spends too much time on Internet & Steam.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -