घरटेक-वेकआता संपूर्ण स्वदेशी बनावटीचं ५ जी तंत्रज्ञान येणार, लवकरच ट्रायल सुरू!

आता संपूर्ण स्वदेशी बनावटीचं ५ जी तंत्रज्ञान येणार, लवकरच ट्रायल सुरू!

Subscribe

लोकांना परवडणाऱ्या दरात इंटरनेट सेवा उपलब्ध केल्यानंतर जिओनं (Reliance Jio) संपूर्ण बाजारपेठेच्याच दरपत्रकामध्ये उलथापालथ करून ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर आता जिओनं अजून एक मोठं पाऊल उचलायचा निर्णय घेतला असून त्यात संपूर्ण भारतीय बनावटीचं ५ जी तंत्रज्ञान जिओ आणणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या भागधारकांची आज वार्षिक बैठक अर्थात AGM सुरू आहे. या बैठकीमध्ये मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली आहे. लवकरच या ५ जी तंत्रज्ञानाचे ट्रायल (Trial) सुरू होतील, असं देखील यावेळी अंबानी यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे भारतीय नेटिझन्सला लवकरच मोबाईलमध्ये ४ जी ऐवजी ५ जी तंत्रज्ञान अनुभवायला मिळणार आहे.

रिलायन्सची ४३वी एजीएम सध्या सुरू आहे. या बैठकीत व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे १ लाखाहून जास्त भागीदार (Share Holders) सहभागी झाले आहेत. यावेळी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. सध्या भारतात ४ जी तंत्रज्ञान आहे. या नंतर आता रिलायन्स जागतिक दर्जाचं ५ जी तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी सज्ज झालं असून लवकरच या तंत्रज्ञानाची चाचणी केली जाईल, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं.

- Advertisement -

‘रिलायन्सने शून्यातून पूर्ण भारतीय बनावटीचं ५ जी तंत्रज्ञान तयार केलं आहे. देशात ५ जी स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यानंतर त्याची चाचणी सुरू केली जाईल आणि पुढच्या वर्षीपर्यंत हे ५ जी तंत्रज्ञान ग्राहकांना वापरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल’, असं यावेळी मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं.

गुगलची रिलायन्समध्ये ३३ हजार कोटींची गुंतवणूक

दरम्यान, यावेळी मुकेश अंबानींनी गुगलसोबत केलेल्या मोठ्या कराराची घोषणा केली. गुगलने (Google) जिओमध्ये ७.७ टक्क्यांची भागीदारी घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तब्बल ३३ हजार ७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक गुगल करणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -