घरअर्थजगत२०२२ पर्यंत जगभरात १३.३ कोटी रोजगार उपलब्ध होणार - रिपोर्ट

२०२२ पर्यंत जगभरात १३.३ कोटी रोजगार उपलब्ध होणार – रिपोर्ट

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार गेले आणि बेरोजगारीचं प्रमाण वाढलं. मात्र, आता जगात अनेक ठिकाणी अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी काही प्रमाणात उद्योग सुरु केले आहेत. दरम्यान, आता २०२२ पर्यंत जगभरात १३.३ कोटी रोजगार उपलब्ध होतील, असा अहवाल सादर करण्यात आला आहे. जगभरात २०२२ पर्यंत सुमारे १३.३ दकोटी रोजगार उपलब्ध असतील, ज्यात मानवांसह, मशीन आणि अल्गोरिदम संबंधित नोकऱ्यांचा समावेश आहे. एका स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी ही माहिती दिली. तसंच भारतातील तरुणांसाठी डिजिटल आणि इंग्रजी साक्षरता वाढवण्यावर भर दिला.

शैक्षणिक स्तरावर जे शिक्षण दिलं जात आहे आणि उद्योगाला काय हवं आहे यामध्ये मोठा फरक असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत, कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र ज्ञान, हरित ऊर्जा आणि इतर क्षेत्रातील तंत्रज्ञानातील उदयोन्मुख क्षेत्रांच्या गरजांनुसार युवकांना कौशल्य प्रदान करणं फार महत्वाचं आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या पूर्वसंध्या (१५ जुलै) रोजी वाधवानी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने ही प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

युवा पिढीमध्ये कौशल्य विकासाच्या गरजेवर भर देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस साजरा केला. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार २०१६ मध्ये २५.९ कोटी तरुण रोजगार, शिक्षण किंवा प्रशिक्षणात सहभागी नव्हते. सन २०१९ पर्यंत ही संख्या २६७ कोटीपर्यंत वाढली असून २०२१ पर्यंत ती वाढून २७.३ कोटी होण्याचा अंदाज आहे. अहवालानुसार टक्केवारीच्या बाबतीत हा कल २०१५ मध्ये २१.७ टक्क्यांवरून २०२० मध्ये २२.४ टक्के झाला आहे. याचा अर्थ असा की २०२० पर्यंत NEET दर कमी करण्याचं आंतरराष्ट्रीय लक्ष्य चुकण्याची शक्यता आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय केला म्हणाले की, आकडेवारीची गरज यावर जोर देताना २०२२ पर्यंत जगभरात मानव, मशीन्स आणि अल्गोरिदम यांच्यात श्रम विभागून घेण्यासाठी किमान १३.३ कोटी रोजगार उपलब्ध होतील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -