घरमहाराष्ट्रनाशिकनिफाड : कोळगावला बिबट्या जेरबंद

निफाड : कोळगावला बिबट्या जेरबंद

Subscribe

निफाड तालुक्यातील येवला वन परिक्षेत्रातील कोळगाव येथे बुधवारी (दि.१५) सकाळी बिबट्या जेरबंद झाला.

कोळगाव या गाव व परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वारंवार बिबट्याचे दर्शन नागरिकांना घडत होते. सततच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत होते. शेतातील कामेही दहशतीखालीच सुरू होती. ग्रामस्थांच्या मागणीवरून सोमवारीच सुधाकर छबू घोटेकर यांच्या शेतात वनविभागाने उपवनसंरक्षक अधिकारी तुषार चव्हाण व सहायक वनसंरक्षक अधिकारी सुजित नवसे यांच्या आदेशानुसार पिंजरा लावला होता. त्याच बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या (अंदाजे वय ६ वर्षे) जेरबंद झाल्याचे दिसून आले. त्याला निफाड वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी येथीलच वनविभागाच्या रोपवाटिकेत आणले असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी दिली. याप्रसंगी येवला वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल जी. पी. वाघ, वनरक्षक भैय्या शेख, आर. एल. बोरकडे, भगवान भुरूक आदी उपस्थित होते.

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -