घरटेक-वेकअसे असेल वाय-फायचे नवीन व्हर्जन

असे असेल वाय-फायचे नवीन व्हर्जन

Subscribe

इंटरनेट युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही वाय-फाय वापरत असाल तर लवकरच तुमच्या इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड वाढवण्यासाठी वाय-फायचे नवीन व्हर्जन येत आहे.

वाढत्या काळाबरोबर इंटरनेटचा वापरही वाढला. वाय-फायद्वारे इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. काळानुसार इंटरनेटच्या स्पीडवर संशोधन होत आहे. यामुळे २जी,३जी आणि आता ४ जी इंटरनेट युजर्सना मिळतो. इंटरनेटच्या स्पीड बरोबरच वाय-फायवरही संशोधन सुरु असून लवकरच वाय-फायचे नवीन व्हर्जन आपल्या पहायला मिळणार आहे. या नवीन व्हर्जनला ‘वाय-फाय ६’ नाव देण्यात आलं आहे. वाय-फाय६ ला सर्पोट करणाऱ्या डिवाइसेसच्या चाचणीचे काम २०१९ च्या सुरुवातीला होणार आहे. वाय-फायच्या या नवीन व्हर्जनमध्ये लोकांना काय नवे फिचर्स मिळतील हे जाणून घेण्यासाटी युर्जस उत्सुक आहेत. या नवीन वाय फाय कनेक्शनला इंटरनेट जोडले जाईल आणि जोडल्या गेलेले इंटरनेट अधिक वेगाने युजर्सकडे पोहचवण्याचे काम वाय-फाय ६ कडून केले जाईल. ८०२.११ax टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणाऱ्या डिव्हाइसला ‘वाय-फाय ६’ला सपोर्ट करेल. युजर्स कोणते वाय- फाय वापरत आहेत याची माहिती मिळावी यासाठी याचं नाव वाय-फाय ६ ठेवण्यात आले आहे.

किती मिळणार इंटरनेट स्पीड

इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी स्पीड ही महत्वाची गोष्ट आहे. नवीन वाय-फायमुळे युजर्सला इंटरनेटचा स्पीड ११GB/PS मिळणार आहे. हा स्पीडमुळे युजर्स नेटवरील कोणताही कंटेन्ट लवकर डाऊनलोड करु शकतील. हे वाय-फाय कॉम्प्यूटर आणि मोबाईलवर ही वापरु शकतो. इंटरनेट मोबाईलवर आल्यामुळे मोबाईल युजर्सलाही याचा फायदा होणार आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे त्यावर संशोधन होत आहे.

- Advertisement -

वाय-फाय अलायन्सच्या सीइओने दिलेल्या माहितीनुसार हे व्हर्जन सुरु होण्या अगोदर युजर्सला कोणते वाय-फाय वापरतो आहे याबद्दल माहिती मिळत नव्हती. तसेच डिव्हाइस वाय-फाय सपोर्ट करते की नाही याबद्दलही त्यांना जाणून घेण्यासाठी नेमिंग कन्वेंशनची मदत घ्यावी लागते. वाय-फाय अलायन्स या नवीन व्हर्जनसाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -