घरटेक-वेकठाकूर इंस्टिट्युटला शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार!

ठाकूर इंस्टिट्युटला शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार!

Subscribe

मुंबईतील ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीला (टीआयएटी) मेन्टेनेन्स, रिपेअर ऍण्ड ओव्हरहॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (एरो एमआरओ) भारतातील सर्वोत्कृष्ट विमान व्यवस्थापन अभियांत्रिकी संस्था म्हणून शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मुंबईतील ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीला (टीआयएटी) मेन्टेनेन्स, रिपेअर ऍण्ड ओव्हरहॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (एरो एमआरओ) भारतातील सर्वोत्कृष्ट विमान व्यवस्थापन अभियांत्रिकी संस्था म्हणून शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेने शिक्षण व प्रशिक्षण देण्याबद्दल टीआयएटीला सन्मानित करण्यात आले आहे. अनेक एव्हिएशन संस्थांमधून एमआरओ असोसिएशन ऑफ इंडियाने भारतातील सर्वोत्तम एएमई संस्था म्हणून टीआयएटीची निवड केली. निवड करण्यात येणारी संस्था ही एमआरओ असोसिएशनची सदस्य घटक असावी, अशी पुरस्काराच्या निवडीसाठी पात्रता निकष होती. टीआयएटी एरो एमआरओची तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून सदस्य घटक असल्याने ही संस्था पात्र ठरली.

…म्हणून टीआयएटीला मिळाला पुरस्कार

एरो एमआरओने विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेचे पालन करत मेक इंडिया संकल्पनेच्या दृष्टीने किती भारतीय विद्यार्थी ठेवण्यात आले आहेत आणि विभिन्न एमआरओमध्ये भारतीय संस्था कोणकोणत्या आहेत याची शाश्वती केली. भारतातील विविध एएमई संस्थांद्वारे एमआरओ आणि ऑपरेटर्ससाठी तयार केलेल्या कार्यबलाबाबत योग्य विचार-विमर्श आणि विश्लेषणानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की टीआयएटीने भारतीय एमआरओ आणि ऑपरेटर्ससाठी एक मजबूत कार्यबल तयार करण्यासाठी जास्त योगदान दिले आहे. भारतातील विविध एमआरओ आणि ऑपरेटर्सच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये पाठवण्यात आलेले विद्यार्थी हे अधिकतम टीआयएटीकडून पाठवण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले टीआयएटीचे मुख्य प्रशिक्षक?

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर टीआयएटीचे मुख्य प्रशिक्षक सुभाजित मैती म्हणाले की, ‘भारतातील सर्वोत्कृष्ट एएमई संस्था म्हणून आम्हाला सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे, पण या पुरस्कारापेक्षा आम्हाला या गोष्टीचा आनंद जास्त होत आहे की टीआयएटी विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाच्या आणि पायाभूत सुविधांसह उत्कृष्ट शिक्षण व प्रशिक्षण देण्यास यशस्वी ठरली आहे. आमच्याकडे या उद्योगक्षेत्रातील अत्यंत अनुभवी आणि समर्पित अध्यापक सदस्य आहेत जे विद्यार्थ्यांना या उद्योगक्षेत्रासाठी योग्य आणि सर्वोत्तम बनवण्यात सहकार्य करतात. म्हणूनच भारतातील विविध एमआरओ आणि ऑपरेटरचे प्रचालन किंवा देखभाल आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विभागांमध्ये पाठवण्यात आले आहेत, ते अधिकतम टीआयटीचे विद्यार्थी आहेत’.

एमआरओ असोसिएशन ऑफ इंडिया ही एक नॉन-प्रॉफिट प्रोफेशनल सोसायटी आहे जी त्यांच्या सर्व सदस्यांच्या हिताचे प्रतिनिधित्व करते, ही संस्था विविध सरकारी आणि नियामक प्राधिकरणाच्या समस्येसाठी एक आवाज असून एमआरओच्या विकासासाठी भारतातील औद्योगिक क्षेत्र म्हणून काम करते. एरो एमआरओने एएमई संस्थांमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आणि भारतीय एमआरओ उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी एव्हिएशन लीडरशीप पुरस्कार सुरु केला आहे, ज्यामुळे हे विमानचालन क्षेत्राचे एक प्रमुख घटक बनले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अदानी कंपनीच्या वीज बिलाच्या तपासासाठी २ सदस्यीय समिती स्थापन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -