घरटेक-वेकTwitterवर २०२१ साली कोणत्या हॅशटॅगने घातला धुमाकूळ; कोणते टॉप ट्रेडिंग होते ट्वीट?

Twitterवर २०२१ साली कोणत्या हॅशटॅगने घातला धुमाकूळ; कोणते टॉप ट्रेडिंग होते ट्वीट?

Subscribe

ट्वीटरवर (Twitter) २०२१मध्ये युजर्सचे मिक्स रिअॅक्शन होते. यादरम्यान ट्वीटरवर तालिबान आणि कोरोनाबाबतच्या हालचाली जास्त पाहायला मिळाल्या. तर खेळ आणि आर्थिक दुनियेत विराट कोहली आणि रतन टाटा यांची चांगलीच चर्चा रंगली. पाहा यावर्षी भारतात ट्वीटरवर कोणते हॅशटॅग आणि कोणते ट्वीट ट्रेडिंगला होते?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर पॅट कमिन्सचे (Pat Commins) भारतामध्ये कोरोना दरम्यान डोनेशन देणारे ट्वीट सर्वात जास्त री-ट्वीट केले गेले आहे. हे भारतातील २०२१मधील सर्वात री-ट्वीट केलेले ट्वीट आहे.

- Advertisement -

तसेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने मुलीच्या जन्मादिवशी केलेल्या ट्वीटला सर्वात जास्त लाईक्स मिळाले आहेत. गेल्या वर्षी २०२०मध्ये अनुष्का शर्माचे गर्भवती असल्याच्या ट्वीटला सर्वाधिक लाईक्स मिळाले होते.

- Advertisement -

याशिवाय आयपीएल दरम्यान महेंद्र सिंग धोनीच्या सामान्यावर विराट कोहलीने केलेले ट्वीट सर्वाधिक रि-ट्वीट केले होते.

सरकारी टॉप ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पहिला लसीचा डोस घेण्यात आलेला फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत. हे ट्वीट वर्षभरातील सर्वाधिक रिट्वीट केलेले ट्वीट आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून टीम इंडियाला गाबामध्ये ऑस्ट्रेलिया विरोधातील ऐतिहासिक विजयानिमित्ताने दिलेल्या शुभेच्छाचे ट्वीट सर्वात जास्त लाईक्स केले आहे.

आर्थिक क्षेत्रातील टॉप ट्वीट

आर्थिक क्षेत्रात रतन टाटाकडून एअर इंडिया खरेदीबाबत करण्यात आलेले ट्वीट सर्वात जास्त रीट्वीट केले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील जास्त रि-ट्विट झालेले ट्वीट

दाक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय याचे बीस्टच्या पोस्टरचे ट्वीट सर्वाधिक रि-ट्वीट केले जाणार ट्वीट आहे. तसेच या ट्वीटला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत.

या हॅशटॅगचा धुमाकूळ

#Covid19

#Farmerprotest

#teamindia

#tokyo2020

#ipl2021

#indiavsengland

#Diwali

#Master

#Bitcoin

#permissiontodance

#afghanista

#CJL19Masks

#indianarmy

#Uttarakhand

#Eid Mubarak

#republic

#IndependenceDay

#InternationalWomen’sDay

#BSC

#crypto

#NFT

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -