घरताज्या घडामोडीआता सर्वसामान्यांनाही परवडणार इलेक्ट्रिक कार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

आता सर्वसामान्यांनाही परवडणार इलेक्ट्रिक कार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

Subscribe

नवी दिल्ली – वाहन चालकांची आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीतून सुटका होणार आहे. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आता सर्व सामान्यांसाठी इलेक्ट्रीक कारची घोषणा केली आहे. इलेक्ट्रीक कारची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी त्यांचा संवाद सुरू आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रीक कारची किंमत एकसारखी होणार आहे. भारतात आता आमूलाग्र बदल होत आहेत. ज्यामध्ये २५० इतके उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

देशातील इलेक्ट्रीक कारची किंमत सर्व सामन्यांसाठी सर्वाधिक आहे. त्यामुळे ही लोक आणि वाहन चालक गाडी घेण्यापासून खूप दूर होतायेत. परंतु केंद्रीय मंत्र्यांनी गुडन्यूज दिली असून आता इलेक्ट्रीक कार खरेदी करणं एकदम सोपं होणार आहे. पुढच्या दोन वर्षात इलेक्ट्रीक आणि पेट्रोलच्या गाड्यांची किंमत लवकरच कमी होतील. असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

भारत ईव्ही क्रांतीची अपेक्षा करत आहे. तसेच २५० व्यवसाय जे EV तंत्रज्ञान निर्मितीमध्ये गुंतलेले आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांवर GST फक्त ५ टक्के आहे आणि लिथियम-आयन बॅटरीची किंमतही कमी होत आहे.


हेही वाचा: CDS Bipin Rawat Death : तिन्ही सेवेच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सीडीएस रावत आणि सुरक्षा जवानांना वाहणार श्रद्धांजली

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -