घरटेक-वेकआज शाओमीचा रोबोट क्लिनर भारतात लाँच होणार

आज शाओमीचा रोबोट क्लिनर भारतात लाँच होणार

Subscribe

याआधी २०१६ मध्ये कंपनीने चीनमध्ये व्हॅक्यूम क्लीनर बाजारात आणला होता.

चीनी टेक कंपनी शाओमी आज १७ एप्रिल रोजी भारतात Mi Robot Cleaner (एमआय रोबोट क्लीनर) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने एक टीझर जारी केला आहे. MI India ने आपल्या ट्विटर हँडलवर एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे. कंपनीने म्हटलं आहे की आज स्मार्ट क्लीनिंग सोल्यूशन लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या उत्पादनाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आहे. मात्र, २०१६ मध्ये कंपनीने चीनमध्ये व्हॅक्यूम क्लीनर बाजारात आणला होता. Mi Robot Cleaner (एमआय रोबोट क्लीनर) अद्याप चीनमध्येच उपलब्ध आहे. त्यामध्ये देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झालं तर, त्यामध्ये लेझर डिस्टन्स सेन्सर देण्यात आला आहे, जो मजल्यावरील सभोवतालच्या गोष्टी स्कॅन करतो. यामध्ये, स्लॅम अल्गोरिदम देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – iPhone SE 2 भारतात लाँच, किंमत बघून बसेल सुखद धक्का


स्लॅम असल्याने, ते घराच्या लेआउटसाठी एक रुप रेखा तयार करतो. Mi Robot Cleaner (एमआय रोबोट क्लीनर)मध्ये १२ सेन्सर आहेत. या रोबोटला Mi Home App वरून नियंत्रित करता येऊ शकतं. Mi Robot Cleaner (एमआय रोबोट क्लीनर)मध्ये ५,२०० mAh बॅटरी आहे. यामुळे तो सुमारे अडीच तास घर स्वच्छ करू शकतो. चीनमध्ये त्याची किंमत CNY १,७९९ (सुमारे १९,५०० रुपये) आहे. त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत, जे आपण निवडू शकता. या मोडमध्ये स्वीपिंग आणि मॉपिंग, केवळ स्वीपिंग किंवा मॉपिंग यासारख्या मोड्सचा समावेश आहे. सध्या भारतात लॉकडाऊन सुरू आहे, परंतु २० एप्रिलला लॉकडाऊन अनेक क्षेत्रातून उचललं जाईल. त्यामुळे कंपनी २० एप्रिलपासून Mi.comवरून त्याची विक्री सुरू करेल, अशी शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -