घरठाणेछत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी 15 बेड राखीव 

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी 15 बेड राखीव 

Subscribe

ठाणे । ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता तृतीयपंथीयांसाठी देखील एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी 15 बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यांच्यासाठी वेगळी ओपीडी देखील सुरु करण्यात आली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे आता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तृतीयपंथीयांना देखील उपचारासाठी हक्काचे बेड उपलब्ध झाले आहेत.
ठाणे महापालिकेचे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे कळवा भागात आहे. याठिकाणी ठाण्यासह मुंब्रा, दिवा, दिघा, नवी मुंबई आदींसह जिल्ह्याच्या विविध भागात रुग्ण उपचारासाठी येत असतात. याठिकाणी 500 बेडची क्षमता आहे. परंतु मधल्या काळात या रुग्णालायवरील ताण अधिकच वाढल्याचे दिसून आले होते. ओपीडीवर तब्बल 2 हजार ते 2700 च्या आसपास रुग्ण रोजच्या रोज ओपडीमध्ये येत आहेत. तर सध्या रोजच्या रोज 100 ते 125 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यात येत्या काळात या रुग्णालयाची क्षमता वाढविली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून 60 कोटींचा निधी देखील महापालिकेला प्राप्त झाला असून आता आणखी 500 बेड याठिकाणी वाढविण्यात येणार आहेत.

दरम्यान असे असतांना आता रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या बाबत आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार रुग्णालयात आता तृतीयपंथीयांसाठी विशेष 15 बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्याचा फायदा आता येथे उपचारासाठी येणार्‍या तृतीयपंथीयांना होत आहे. याशिवाय याच ठिकाणी एक कर्मचारी त्यांच्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना ओपीडीची सेवा देखील पुरविली जात आहे. यापुढेही जाऊन त्यांच्यासाठी विशेष डॉक्टराची नियुक्ती आणि मानोसोपचार तज्ज्ञ देखील उपलब्ध करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -