घरठाणेडोंबिवलीत गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती, उभारली टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती

डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या देखाव्यातून कर्करोगाविषयी जनजागृती, उभारली टाटा हॉस्पिटलची प्रतिकृती

Subscribe

डोंबिवली – कॅन्सर म्हणजेच कर्करोग या आजाराविषयी समाज अधिक सतर्क व्हावा यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीत असणाऱ्या ‘बालाजी आंगन काॅम्पलेक्स’ने पुढाकार घेतला आहे. २०२२च्या गणेशोत्सवात त्यांनी ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल’ची उभारणी केली आहे. ‘बालाजी आंगन कॉम्प्लेक्स’चं गणेशोत्सवाचं यंदाचं सातवं वर्ष आहे. कॅन्सरविषयी जनजागृती आणि टाटा मेमोरीयल रुग्णालयाचा देखावा तेजस सौंदणकर, दिव्यांश सिंघ, स्वप्नील घाडी, राहुल दळवी, मंगेश तेली या कलाकारांनी उभा केला आहे. या कलाकारांना विनय हडकर, हिमांशू ढंग, प्राजक्ता केळुस्कर, यशश्री राऊत, सोनाली उकर्डे , विशाल साळवे, प्रथमेश मेस्त्री, शुभम सावंत यांनी मदत केली आहे.

हेही वाचा – उत्कृष्ट देखाव्याला राज्य सरकारकडून मिळणार ५ लाखांचं पारितोषिक, वाचा निकष!

- Advertisement -

याविषयी वसाहतीच्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर सांगतात, “दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही देखाव्यातून सामजिक संदेश देण्याचं प्रयत्न करत आहोत. या वर्षी आम्ही कॅन्सर या आजारावर आरास उभी करून कॅन्सरबदल जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आज हा आजार बहुतेक लोकांच्या घरी आहे. पण या आजारावरचे उपचार मर्यादित हॉस्पिटलमध्ये होतात. मुख्य म्हणजे त्या आजारावर उपचार करण्यासाठी टाटा हाॅस्पिटलचं योगदान खरंच मोलाचं आहे. सर जेआरडी टाटांच्या विचारांना मानवंदना म्हणून आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिलची उभारणं देखाव्यामध्ये केली आहे. हा देखावा उभा करण्याची संकल्पना ही रुपेश राऊत, अभिजित बिल्ले, सुशांत भोवड, ओमकार वायंगणकर यांची आहे. ”

हेही वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! ठाण्यात १ लाख बाप्पांचं होणार आगमन, स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर

- Advertisement -

“१९४१ सली सुरू झालेल्या या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलने लाखो कॅन्सर या आजाराने बाधित रुग्णांना जीवनदान दिलं आहे. कॅन्सरचे उपचार सामान्य माणसांना परवडतील असे हे एकमेव हॉस्पिटल अहे. कल्याण- डोंबिवलीत अशा एका हॉस्पिटलची खरच खूप गरज आहे; जेणेकरून भविष्यात कसारा-कर्जत-नाशिकडून येणाऱ्या रुग्णांसाठीसाठी हे एक मध्यवर्ती ठिकाण बनेल”, असं ‘बालाजी आंगन कॉम्प्लेक्सच्या गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख प्रवीण केळुस्कर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -