घरमहाराष्ट्रनाशिकमवाळ उमेदवार ‘मव्रिप्र’चा सक्सेस फॅक्टर

मवाळ उमेदवार ‘मव्रिप्र’चा सक्सेस फॅक्टर

Subscribe

नाशिक : शैक्षणिक क्षेत्रात 108 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेत तब्बल 20 वर्षांनंतर सत्तातर झाले. अ‍ॅड.नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलच्या स्वभावाच्या उमेदवारांनी मातब्बर उमेदवारांचा पराभव केला. त्यामुळे उमेदवारांचा मवाळ स्वभाव हाच या निवडणुकीचा ‘सक्सेस फॅक्टर’ ठरल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. परंतु, कारभार सांभाळताना स्वभावाच्या विरुध्द म्हणजेच कठोर निर्णय घ्यावे लागतील, ते घेण्याची तयारी अ‍ॅड.नितीन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व संचालक घेतील का? आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्ती येत्या पाच वर्षात होणार का? ही आव्हाने सत्ताधार्‍यांना पेलावी लागणार आहेत.

अ‍ॅड.गुळवेंचा परफेक्ट टायमिंग

- Advertisement -

इगतपुरी तालुक्याचे संचालक अ‍ॅड.संदीप गुळवे हे प्रगती पॅनलकडून उमेदवारीची मागणी करत होते. परंतु, तिकडे नकार मिळणार असल्याचे समजताच त्यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी ‘परिवर्तन पॅनल’मध्ये प्रवेश केला. तरिही त्यांना उमेदवारी न देण्याचा विचार सुरु होता. परंतु, त्यांच्याकडील यंत्रणा व निवडणूक खर्चाची तयारी बघून त्यांना उमेदवारी मिळाली. या निर्णयामुळे येथील पागेरेंसह इतरांनी ‘प्रगती’ला पाठिंबा दिला. तरिही त्याचा काही फायदा झाला नाही.

चांदवडला एकटे डॉक्टर लढले

- Advertisement -

चांदवड तालुक्यात डॉ.सयाजी गायकवाड यांच्या विरोधात उत्तम भालेराव, डॉ.आत्माराम कुंभार्डे यांची फौज मैदानात होती. तर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल हे ऐनवेळी ‘म्यूट’ झाले. त्यामुळे डॉ.सयाजी गायकवाड यांना एकटे पाडण्यात विरोधकांना यश आले; पण, निवडणुकीत 696 मतांनी पराभव पत्करावा लागला.

नाशिक शहरात सुप्त लाट

नाशिक शहरातील परिवर्तनचे उमेदवार लक्ष्मण लांडगे हे नानांच्या ‘प्रगती’पुढे फिके पडतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, त्यांनी आखलेले नियोजन व परिवर्तन पॅनलचा मिळालेला पाठिंबा या जोरावर लांडगेंना ‘लॉटरी’ लागली. नाशिक ग्रामीणमध्ये प्रगतीचे सचिन पिंगळे हे 2017 च्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडूण आले होते. यंदा त्यांचा पराभव होणार नाही, असे दिसत असताना भावकिच्या राजकारणातून रमेश पिंगळेंसारखा उमेदवार ‘परिवर्तन’ला मिळाला आणि त्यांनी बदल घडवून दाखवला.

लाटेवर स्वार झालेले अमित बोरसे

नांदगाव तालुक्याचे उमेदवार अमित बोरसे हे सर्वात तरुण संचालक ठरले आहेत. त्यांना तालुक्यात कमी मते मिळाले तरी जिल्ह्यातील परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होत त्यांनी पहिला विजय मिळवला.

येवल्यात बनकरांचा करिष्मा

प्रगती पॅनलचे उमेदवार माणिकराव शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नंदकुमार बनकर यांनी कंबर कसली. केवळ येवल्यापर्यंत मर्यादित न राहता नांदगाव, निफाडमध्ये लक्ष देवून मतदान मिळवले.

मित्रानेच मित्राचा केला पराभव

देवळा तालुक्यात ‘शोले’ची दोस्ती असलेले प्रगतीचे केदा आहेर व परिवर्तनचे विजय पगार यांच्यात सरळ लढत झाली. यात केदा आहेर हे सहज विजयी होतील असा अंदाच होता; परंतु, मित्राच्या सर्व बारकावे माहित असलेल्या पगारांनी आहेरांवर मात करत ‘विजय’ मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -