घरठाणेअखेर प्रतीक्षा संपली! ठाण्यात १ लाख बाप्पांचं होणार आगमन, स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर

अखेर प्रतीक्षा संपली! ठाण्यात १ लाख बाप्पांचं होणार आगमन, स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर

Subscribe

ठाणे – ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरात ३१ ऑगस्टला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमारे एक लाख ४१ हजार ४२० बाप्पांच्या मूर्तींचे विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामध्ये घरगुती एक लाख ४० हजार ३६६ तर १ हजार ५४ सार्वजनिक बाप्पांचे वाजगाजत आगमन होणार आहे.

मागील दोन ते अडीच वर्षापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंधाच्या चौकटीत राहून व भितीच्या वातावरणात गणेशोत्सव सण साजरा करण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून राज्य शासनाने सण उत्सावांवरील निर्बंध देखील हटविल्याने मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगमन मिरवणूक आणि विसर्जन मिरवणुकांवरील देखील निर्बंधमुक्त झाल्याने ढोल ताशांच्या गजरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यातील 57 हजारांहून अधिक चाकरमानी लालपरीतून कोकणाकडे रवाना

त्यातच यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था केली आहे. त्यातच खासगी गाड्या घेऊन जाणाऱ्यांसाठी टोल फ्री पासचे वाटप करणे सुरू आहे. त्यातच ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या आयुक्तालयाचा पाच परिमंडळात एकूण १ लाख ४१ हजार ४२० बाप्पांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे.

- Advertisement -

उल्हासनगरात सर्वाधिक बाप्पा

उल्हासनगर शहरासह अंबरनाथ, बदलापूर या परिसरात सर्वाधिक सार्वजनिक आणि घरगुती श्रींचे आगमन होणार आहे. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवली येतो. उल्हासनगरात सार्वजनिक २६४ तर घरगुती ४४ हजार ७०१ बाप्पांचे आगमन होणार आहे.

हेही वाचा – झटपट श्रीमंत होण्यासाठी कासवाची पूजा, पितळ उघडे होताच भोंदूबाबा पसार

गौरीमातांची संख्या १२ हजार; उल्हासनगर आघाडीवर

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शनिवारी ०३ सप्टेंबरला १२ हजार २६० गौराई मातेचे आगमन होणार आहे.यामध्ये सर्वाधिक उल्हासनगर परिमंडळामध्ये ४ हजार ४३६, त्याखालोखाल कल्याण- ३ हजार ३६७,वागळे इस्टेट – १ हजार ९७२, ठाणे शहर- १ हजार ८२५ आणि भिवंडीत ५६० गौराई मातांचा समावेश आहे.

हेही वाचा – विसर्जनासाठी ठाणे पालिकेचा पर्यावरणभिमुख निर्णय, प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती

शहर पोलीस आयुक्तालयातील बाप्पा 
परिमंडळ     सार्वजनिक     घरगुती
ठाणे शहर     १३६            १९,५५६
भिवंडी         १६१            १०,३५७
कल्याण       २८७           ४२,२१०
उल्हासनगर   २६४           ४४,७०१
वागळे इस्टेट  २०४            २३,४३२
एकूण         १,०५४          १,४०,३६६

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -