Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ठाणे सरनाईक-आव्हाड! तब्बल १२ वर्षानंतर ठाण्यातील 'दो हंसो का जोडा' पुन्हा एकत्र

सरनाईक-आव्हाड! तब्बल १२ वर्षानंतर ठाण्यातील ‘दो हंसो का जोडा’ पुन्हा एकत्र

Related Story

- Advertisement -

तब्बल बारा वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ पूर्वी ठाण्यातील राजकारणात जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक म्हणजे ‘दो हंसो का जोडा’ म्हणून ओळखले जायचे. मात्र २००८ साली प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाच्या वादावरून राष्ट्रवादीतून बाहेर पडत शिवसेनेचा रस्ता धरला आणि त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्यातील मैत्री राजकारणामुळे दुभांगली गेली. मात्र आता तब्बल बारा वर्षानंतर पुन्हा एकदा वर्तक नगर मधील पोलीस वसाहतींच्या पुनर्निर्माण यांच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ओवळा माजिवडा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे आज एकत्र पत्रकार परिषद घेत आहेत.

२००८ साली प्रताप सरनाईक यांच्या समता नगर मधील हॉटेलमध्ये ते राष्ट्रवादीतून बाहेर पडत असल्याची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि ती गोष्ट होण्यापूर्वी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे प्रताप सरनाईक यांची समजूत घालण्याकरता या पत्रकार परिषदेपूर्वी सरनाईक यांच्या हॉटेलमध्ये स्वतः आले होते. मात्र राष्ट्रवादीत राहिल्यास आपल्याला आमदार होणे शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे प्रताप सरनाईक यांनी आव्हाड यांच्या मनधरणी नंतरही शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली. मात्र त्यामुळे आव्हाड आणि सरनाईक यांच्या काही दशकांच्या मैत्रीत खंड पडला. त्यामुळे त्यानंतर खाजगी कार्यक्रम वगळता कोणत्याही राजकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक ते पुन्हा कधीही एकत्र आलेले दिसले नाहीत.

- Advertisement -

त्यानंतर प्रताप सरनाईक तब्बल दोन वेळा ओवळा माजिवडा यासारख्या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये सुदैवाने राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी विकास सरकार स्थापन केले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे राज्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्रिपद आले आणि प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील वर्तक नगर येथील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाला गती मिळाली. २०१४ सली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर ही प्रताप सरनाईक हे वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील होते. त्याबाबत कालच मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार प्रताप सरनाईक आमदार यांच्या उपस्थितीत अंतिम मान्यता मिळाली. त्यामुळे बारा वर्षापूर्वी राजकारणामुळे विभक्त झालेल्या या दोघा मित्रांना पुन्हा एकदा वर्तक नगरमधील पोलीस वसाहतींच्या निमित्त्याने एकत्र पत्रकार परिषद घेण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणात पूर्वी ओळखला जाणारा हा ‘दो हंसो का जोडा’ पुन्हा एकदा मनोमिलन करत एकत्र येणार का याची उत्सुकता ठाणेकरांना लागून राहिली आहे.

हेही वाचा –

महाराष्ट्रात मराठीच हवी; ठाकरे सरकार ५५ वर्षांपुर्वीचा कायदा बदलणार

- Advertisement -