घरठाणेमुरबाड नगरपंचायतीच्या तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा?

मुरबाड नगरपंचायतीच्या तिजोरीत ठेकेदाराचा काळा पैसा?

Subscribe

जिल्हाधिका़र्‍यांकडून चौकशीचे आदेश

मुरबाड । नगरपंचायतीच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच निधी लाटण्याचा आरोप राहुल हिंदुराव या ठेकेदारावर झाला आहे. या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सुरू केली आहे. मुरबाड शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकास विभागाने नगरोत्थान योजनेतून कोट्यवधी रुपये मुरबाड नगरपंचायतीला दिले. मुरबाड नगरपंचायतीने ही कामे आपल्या मर्जीतील ठेदारांना देऊन शासनाचा निधी खर्च केला. मात्र उघडी गटारे, रस्ते आणि शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी वस्तीत येत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. या ठिकाणी राहुल हिंदुराव या ठेकेदाराने कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. परंतु ती कामे अस्तित्वात नसल्याचे उघड झाले.

याबाबत शिवसेना कार्यकर्ते संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुधाळे, सागर भंडारी, दिपक दुधाळे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली असता प्रसारमाध्यमांनी हा प्रकार उजेडात आणला. त्यानंतर ठेकेदाराने मुरबाड नगरपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नगरोत्थान खात्यावर सुमारे आठ लाख चौतीस हजार रुपये जमा केले. याबाबत नगरपंचायतीने राहुल हिंदुराव ठेकेदाराला लेखी पत्र दिले असता त्याने समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे नगरपंचायतीने जिल्हाधिकारी यांचेकडे अहवाल सादर केला असता त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले आहेत. मुरबाड नगरपंचायतीच्या नगरोत्थान खात्यावर संबंधित ठेकेदाराने अनधिकृतपणे जमा केलेल्या रकमेची जिल्हाधिकारी स्तरावरुन चौकशी सुरू आहे. त्याचे चौकशी अधिकारी उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर हे आहेत – मनोज म्हसे, मुख्याधिकारी, मुरबाड नगरपंचायत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -