घरठाणेठाणे लोकसभेसाठी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

ठाणे लोकसभेसाठी ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

Subscribe

ठाणे । ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २० मे २०२४ रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत एकूण ४३ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती २५ ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज देण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून विविध पक्षाच्या उमेदवारांच्या २५ प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यत एकूण ४३ नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यात भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसन पार्टी २ आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक ३ मे २०२४ असून नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक ४ मे २०२४ रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक ६ मे २०२४ अशी आहे. शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४, रविवार दिनांक २८ एप्रिल २०२४ व बुधवार दिनांक १ मे २०२४ महाराष्ट्र दिन या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

भिवंडीत ५४ उमेदवारी अर्जांचे वाटप
भिवंडी । भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी सकाळ पासून उमेदवारी अर्ज वाटप सुरू झाले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून २५ उमेदवारांना पहिल्याच दिवशी ५४ उमेदवारी अर्ज वाटप करण्यात आले असून एकाही उमेदवाराने पहिल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याची माहिती भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली.प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज घेऊन येणार्‍या उमेदवारांचे अर्ज तपासणी तसेच उमेदवारी अर्जाला जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व वेगळी व्यवस्था केली असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात २ नामनिर्देशनपत्रे दाखल
ठाणे । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २४-कल्याण लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण २ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये सुशिला काशिनाथ कांबळे, बहुजन समाज पार्टी, अमित उपाध्याय, राईट टू रिकॉल पार्टी यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -