Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाण्यात डेंग्यू, मलेरियापेक्षा लेप्टोची भीती

ठाण्यात डेंग्यू, मलेरियापेक्षा लेप्टोची भीती

Subscribe

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मलेरिया, डेंग्यू, इन्फ्लूयएन्झा या आजाराच्या रुग्णांची संख्या जरी अधिक असली तरी लेप्टो या आजाराची भीती जास्त आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये या आजाराचे अवघे 9 रुग्ण सापडले असले तरी त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत लेप्टोस्पायरोसिस या आजाराने एक रुग्ण दगावला होता. या घटनेची ठाणे शहरात पुनरावृत्ती होवू नये, यासाठी ठाणे पालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधांचा साठा, औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत होती. परंतु एवढे करुनही दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे पलिका क्षेत्रात जानेवारी 2023 ते 12 ऑगस्ट 2023 या कालावधीत लेप्टोस्पायरोसिसचे 9 रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 24 रुग्ण आढळले होते. मात्र एकाही मृत्यूची नोंद नव्हती. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यात स्वाइन फ्ल्यू आजाराने डोके वर काढल्याचे दिसून आले. या कालावधीत 222 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर स्वाइन फ्ल्यूचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर ठाणे पालिका क्षेत्रात इन्फ्ल्यूएन्झा आजाराने देखील डोके वर काढल्याचे दिसत आहे. जानेवारी ते जून या कालावधी 42 रुग्ण होते. मार्च महिन्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात इन्फ्लूइन्झाचे 72 रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्युचे जानेवारी ते 12 ऑगस्ट या कालावधीत 30 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 14 रुग्ण हे ऑगस्ट महिन्यातील आहेत. मागील वर्षी या कालावधीत 75 रुग्णांची नोंद झाली होती. मलेरियाचे याच कालावधीत 222 रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत 583 रुग्ण आढळले होते.
दुसरीकडे वातावरणीय बदलामुळे त्याचा फटका लहाणांपासून वयोवृद्धांना त्याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना सर्दी, खोकल्यासह घशात खवखवणे आणि अंग दुखीचा ताप वाढला असून शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात सकाळ संध्याकाळच्या वेळी रुग्णांची गर्दी ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -