घरठाणेकल्याण-कसारा रेल्वेच्या तिसर्‍या मार्गीकेवरून वादाची शक्यता

कल्याण-कसारा रेल्वेच्या तिसर्‍या मार्गीकेवरून वादाची शक्यता

Subscribe

कल्याण ते कसारा तिसर्‍या रेल्वे मार्गीकेसाठी वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या वहिवाटेतून जाणार्‍या मार्गीकेच्या कामाला बुद्धभूमी फाउंडेशनने विरुद्ध दर्शविला आहे. मार्गीकेसाठी 31 गुंठे जागा जात असून या जागेत बुद्धमूर्ती आहेत. सोमवारी जागा अधिग्रहण करण्यासंदर्भात प्रांत अधिकार्‍यांनी नोटीस बजावल्याने कारवाई दरम्यान वादंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुद्धभूमी फाउंडेशनने या जागेत 22 बुद्ध मूर्त्या, शंभरच्या आसपास बोधीवृक्ष,बुद्ध विहार, भिख्खू निवास, धम्म साधक निवास, विद्यार्थी अभ्यासिका आणि विपश्यना केंद्र आदी बांधले आहे. विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, व्यक्तिमत्व शिबिर, रोजगार मेळावा, धम्म साहित्य संमेलन, वधुवर परिचय मेळावा, संविधान जनजागृती कार्यशाळा, महिला सबलीकरण शिबिर, वैद्यकीय शिबिर असे अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी संयोजक राबवीत असतात. मात्र या जागेतून तिसरी रेल्वे मार्गिका जात असल्याने बुद्धभूमी फाउंडेशनने याला जोरदार विरोध दर्शविला आहे. याबाबत कल्याणचे प्रांत अभिजीत भांडे पाटील यांनी 31 गुंठे जागा ताब्यात घेण्यासाठी दोन बुद्ध मूर्ती स्थलांतरित करण्याबाबत बुद्धभूमी फाउंडेशनचे भदंत गौतमरत्न थेरो यांना सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे.

या संदर्भात भदंत गौतमरत्न थेरो म्हणाले की, आम्ही या जागेवर कल्याणकारी योजना राबवीत असून पोलीस बळाचा वापर करून जागा अधिग्रहण करू नये, तसेच गौतम बुद्धांची मूर्ती जबरदस्तीने स्थलांतरित न करता वहिवाटेतील जागा संपादित न करता पश्चिम बाजूने जागा करावी तसेच याबाबत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला पोलीस रेल्वे पालिका आणि प्रांताधिकारी जबाबदार राहणार असल्याचा इशारा भदंत गौतमरत्न थेरो त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

जागा केडीएमसीच्या नावावर- भांडे-पाटील, प्रांत
बुद्धभूमी फाउंडेशनची जमीन खासगी असून केडीएमसीने टीडीआर देऊन जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. तर बुद्धभूमी फाउंडेशनचे जमीन आमच्या गेल्या अनेक वर्षापासून कब्जा वहिवाटेत असल्याचे म्हणणे आहे. सातबारा केडीएमसीच्या नावावर असल्याने जमीन कल्याण-कसारा मार्गिकेसाठी खरेदी केली. मोबदला देण्यापूर्वी जागेचे दावेदार असलेले सुरेंद्र चिखले आणि बुद्धभूमी फाउंडेशनला म्हणणे ऐकून घेण्यासाठी पुरेशी संधी दिली. मात्र सहाव्या महिन्यात दोघांनाही मोबदला देता येणार नाही, तसेच हा मोबदला केडीएमसीला देण्याचा निकाल आपण दिला असल्याची माहिती ‘आपलं महानगर’ शी बोलताना कल्याणचे प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली. पूर्वी जे अतिक्रमण होते. ते यापूर्वीच काढण्यात आले असून रेल्वेकरता ती जागा संपादित झाली असल्याने मूर्ती सोमवारपर्यंत काढण्याची विनंती आपण केली आहे. जर तसे न केल्यास पुतळ्यांची समाज मंदिरात किंवा केडीएमसी कार्यालयात मंगळवारी प्रतिष्ठापना करण्यात येईल असेही प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -