हॉस्पिटलसाठी देणग्या एमसीएचआय-जितोला; पण, खर्च पालिकेच्या तिजोरीतून!

Why frequent extension of online tenders for road cleaning in Thane?; Congress question
ठाण्यतील रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांनाच वारंवार मुदतवाढ का?; कॉंग्रेसचा सवाल

बाळकुम येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील १००० बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी बिल्डरांच्या देणग्या थेट `एमसीएचआय’ आणि `जितो ट्रस्ट’च्या तिजोरीत जमा झाल्या. त्याचा हिशोब गुलदस्त्यात असतानाच आता ग्लोबल हॉस्पिटलमधील वाढीव बेडसाठी आणखी १५ कोटींचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला. या प्रकाराला भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे. बड्या बिल्डरांच्या प्रकल्पातून सामाजिक कामांसाठी कॉर्पोरेट पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) निधी जमा केला जातो. त्यातून सरकार वा महापालिकेला आरोग्यासह विविध कामे करता येतात. मात्र, कोरोनाच्या रुग्णांसाठी महापालिकेने `ग्लोबल हब’ येथे उभारलेल्या हॉस्पिटलसाठी सीईआर निधीच्या सर्व देणग्या थेट एमसीएचआय व जितो ट्रस्टकडे सोपविण्याचा आदेश महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी काढला होता. त्यानंतर त्यांच्याकडून शहरातील बड्या बिल्डरांना पत्र पाठवून एमसीएचआय व जितोच्या खात्याचे क्रमांक देऊन निधी जमा करण्याची सुचना करण्यात आली होती. मात्र, या हॉस्पिटलमध्ये जितो-एमसीएचआयची जबाबदारी नक्की कोणती असेल, याबाबत महापालिकेने खुलासा अद्यापि केलेला नाही, याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले.

आता ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणखी १५० खाटांचा अतिरिक्त आयसीयू व १५० खाटांचा अतिरिक्त ऑक्सिजन सप्लायसह जनरल वॉर्ड, वैद्यकिय उपकरणे, फर्निचर आदी साहित्य महापालिकेने खरेदी केले. त्यासाठी ८ कोटी ४३ लाख ७७ हजार ८७९ रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली असून, २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेपुढे प्रस्ताव क्र. ९० द्वारे ही माहिती देण्यात आली आहे. तर प्रस्ताव क्र. ११३ द्वारे ग्लोबल हॉस्पिटलमध्येच आयसीयू व ऑक्सीजन बेड विस्तारीकरणाच्या कामासाठी ६ कोटी २३ लाख ७२ हजार रुपये खर्च करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दोन प्रस्तावांवरून ग्लोबल हॉस्पिटलसाठी महापालिकेने १४ कोटी ६७ लाख ४९ हजार ८७९ खर्च केला असल्याचे उघड होत आहे. या हॉस्पिटलसाठी एमसीएचआय व जितो ट्रस्टने देणग्या जमा केल्या. त्यांनी हॉस्पिटलचा सर्व खर्च करण्याचे अपेक्षित होते. मग ठाणे महापालिकेकडून सुमारे १५ कोटी रुपये का खर्च करण्यात आला, असा सवाल नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.